तुम्ही वेगवेगळ्या इन्शुरन्सबद्दल आतापर्यंत ऐकलं असेल पण तुम्हाला इव्हेंट इन्शुरन्सबद्दल माहिती आहे का? नसेल माहिती तर आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती देणार आहोत. चला तर मग इव्हेंट इन्शुरन्स म्हणजे काय, कधी काढता येतो, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
इन्शुरन्स ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. विशेषत: जेव्हा आरोग्य आणि जीवन विम्याचा विचार केला जातो, तेव्हा विमा अधिक महत्वाचा असतो. हेल्थ इन्शुरन्स घेऊन तुम्ही भविष्यातील आजारपणात होणारा मोठा खर्च टाळू शकता. त्याचबरोबर लाइफ इन्शुरन्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करू शकता. त्याचप्रमाणे होम इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, वेडिंग इन्शुरन्स आहेत, जे भविष्यातील नुकसान भरून काढतात, पण इव्हेंट इन्शुरन्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का? इन्व्हेंट इन्शुरन्स हादेखील एक प्रकारचा इन्शुरन्स आहे. आज आम्ही तुम्हाला इव्हेंट इन्शुरन्सबद्दल सांगणार आहोत.
इव्हेंट इन्शुरन्स म्हणजे काय?
इव्हेंट इन्शुरन्स हा एक प्रकारचा विमा आहे जो एखाद्या घटनेदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई करतो. एखाद्या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई इव्हेंट इन्शुरन्स घेऊन सहज भरून काढता येते.
‘या’ परिस्थितीत इव्हेंट इन्शुरन्स क्लेम उपलब्ध
इव्हेंट इन्शुरन्स घटनेदरम्यान होणारे कोणतेही नुकसान कव्हर करू शकतो. यामध्ये कार्यक्रम रद्द करणे, मालमत्तेचे नुकसान किंवा कोणत्याही वस्तूचे नुकसान, कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तीला इजा होणे इत्यादींचा समावेश आहे.
इव्हेंट इन्शुरन्स घेताना जाणून घ्या ‘या’ गोष्टी
जर तुम्ही स्वत:चा एखादा इव्हेंट करणार असाल तर प्रोटेक्शनसाठी इव्हेंट इन्शुरन्स घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमचा इन्शुरन्स किती कव्हर करतो याची विशेष काळजी घ्यावी लागते. आपल्या इव्हेंटच्या आकार आणि जोखमीनुसार हे ठरवा.
विमा घेताना विम्याच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा. याशिवाय या विम्याच्या क्लेम प्रक्रियेविषयी आगाऊ जाणून घ्या. तसेच, इव्हेंट इन्शुरन्सचा प्रीमियम देखील इव्हेंटच्या आकारावर अवलंबून असतो.
कोणतेही काम करताना आपण खबरदारी घेतो. तशाच प्रकारे इन्शुरन्सचं देखील आहे. आपण अशा प्रकारचे इन्शुरन्स काढून ठेवल्यास भविष्यात होणारे नुकसान काही प्रमाणात का होईना भरुन काढता येईल. तसेच आपण मोठ्या आर्थिक संकटातही सापडणार नाही.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)