IND vs ENG 5th Test: सरळसरळ चिटींग! अम्पायर Kumar Dharmasena ने इंग्लंडला केला 'तो' इशारा अन् DRS वाचवण्याचा आरोप... Video Viral
esakal August 01, 2025 05:45 AM

England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावरील पंच कुमार धर्मसेना ( Umpire Kumar Dharmasena ) यांच्या एका हावभावामुळे इंग्लंडचा DRS वाचला अशी टीका होतेय. १३ व्या षटकात जोश टंगने टाकलेला चेंडू साई सुदर्शनच्या पॅडवर आदळला. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी तातडीने LBW यूसाठी अपील केले, परंतु धर्मसेना यांनी भारताच्या बाजूने निकाल दिला. त्यांचा निर्णय योग्य असला तरी, त्यांनी १५ सेकंदांचा DRH टाइमर संपण्यापूर्वीच तो इशारा केला अन् वादाला तोंड फुटले.

इंग्लंडने पाचव्या कसोटीत टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गस अॅटकीन्सन व ख्रिस वोक्स यांनी भारताच्या यशस्वी जैस्वाल ( २) व लोकेश राहुल ( १४) या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. २ बाद ३८ अशा धावसंख्येवरून शुभमन गिल व साई सुदर्शनने संयम दाखवताना पहिले सत्र खेळून काढले. गिलने या कसोटी मालिकेत १०००+ चेंडूंच सामना केला आहे आणि एकाच मालिकेत दोन भारतीयांनी ( लोकेश राहुल - १०३८ चेंडू) १०००+ चेंडूंचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. इतके चेंडू खेळण्याची ही या दोघांची पहिलीच वेळ ठरला.

IND vs ENG 5th Test: 0.00305%: भारतीय संघाने असा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, जो आता तुटणे जवळपास अशक्यच...

भारताकडून सुनील गावस्कर व राहुल द्रविड यांनी पाच मालिकांमध्ये हा पराक्रम केला आहे. विराट कोहली ( ३), चेतेश्वर पुजारा ( २) यांचा क्रमांक नंतर येतो. राहुल व गिल यांनी आज मोहिंदर अमरनाथ, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, विजय हजारे व मुरली विजय यांच्या पंक्तीत स्थान पटकावले.

सलामीवीर म्हणून परदेशातील कसोटी मालिकेत सर्वाधिक चेंडू खेळण्याच्या भारतीय सलामीवीराच्या विक्रमात KL Rahul ने सुनील गावस्कर यांचा ( १०३२ चेंडू) १९७७-७८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील विक्रम मोडला. राहुलने या मालिकेत १०३८ चेंडूंचा सामना केला आहे, त्याला मुरली विजय ( १०५४ - वि. इंग्लंड, २०१४) आणि सुनील गावस्कर ( ११९९ - वि. इंग्लंड, १९७९) यांचा विक्रम खुणावतोय.

:
  • दुसरे सत्र - ७:३० ते ९:३५ वाजता.

  • चहापानाचा ब्रेक - ९:३५ ते ९:५५ वाजता

  • तिसरे सत्र - ९:५५ ते ११:३० वाजता ( १२:०० am)

  • पावसामुळे खेळ वाया गेल्याने ३० मिनिटांचा अतिरिक्त खेळ होईल

काय होता तो इशारा?

जोश टंगच्या फुलटॉसवर साई सुदर्शन धडपडला आणि इंग्लंडकडून जोरदार अपील झाले. तेव्हा अम्पायर कुमार धर्मसेना हे एक बोट दुसऱ्या बोटावर आदळून काहीतरी इशारा करताना दिसले. समालोचकांनी अम्पायरच्या इशाऱ्यावर आक्षेप घेतला आणि हे योग्य आहे का असा सवाल केला? संजय बांगर म्हणाला, अम्पायरची ही सवय असते. पण, अम्पायरने असे खुणवणे चुकीचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.