शिऊर : देवदर्शनाहून परतणाऱ्या शिऊर येथील दोन युवकांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना मध्य प्रदेशातील सेंधवा (जि. वडवणी) येथे बुधवारी (ता. ३०) दुपारी दोनला घडली. योगेश अशोक चव्हाण (वय २५, रा. शिऊर, ता. वैजापूर) असे मृताचे नाव आहे. योगेश आणि रोहित गौतम पगारे हे दोघे मित्र मध्य प्रदेशातील उज्जैन येथे देवदर्शनासाठी २८ जुलैला दुचाकीवरून गेले होते.
बुधवारी तेथून परतताना सेंधवाजवळील एमबी रोडवर त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीला (एमएच-२०, सीयू-९१८०) पाठीमागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने (एचआर-५८, ई-३४२७) जोराची धडक दिली.
Beed News: कोरोनातली उधळपट्टी चौकशीच्या फेऱ्यात; बारा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, सकाळ’ने वृत्तमालिकेतून टाकला होता प्रकाशयावेळी योगेश हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र रोहित जखमी झाला. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. योगेश हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.