वाहतूक सुरक्षा जनजागृती अभियान
esakal August 01, 2025 05:45 AM

ज्ञानदीप सेवा मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून वाहतूक सुरक्षा जनजागृती अभियान

नवी मुंबई, ता. ३१ ः ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी नेक्सस सीवूड्स मॉलमध्ये वाहतूक सुरक्षा जनजागृती अभियान गुरुवारी (ता. ३१) राबविले आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक कवायत आणि पथनाट्य सादर केले.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग मोहिनी लोखंडे आणि त्यांचे सहाय्यक पोलिस तसेच नेक्सस सीवूड्स मॉलचे व्यवस्थापकीय अधिकारी आणि ज्ञानदीप सेवा मंडळ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बंकट तांडेल आणि सहकारी शिक्षक उपस्थित होते. या पथनाट्याचे लेखन, दिग्दर्शन आरएसपी शिक्षक हरेश तांडेल यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.