बनावट आधारकार्ड आणि व्होटरकार्ड बाळगल्याप्रकरणात कोलकाता पोलिसांनी एका मॉडेलला अटक केली आहे. ही हिरोईन आधी एअर होस्टेस होती नंतर ती मॉडेल बनली होती. ती गेल्या सहा वर्षांपासून कोलकातात राहात होती. कोलकाता पोलिसांनी पार्क स्ट्रीट पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मॉडेलविरोधात बीएनसीचे कलम 336(3)/338/341/61(2) अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे.
अटक आरोपी मॉडेलचे नाव शांता पॉल (28) असे आहे. ती 6/ए, विक्रमगड येथे भाड्याने रहात होती. तिला पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट, रिजेंट एअरवेजचे ( बांगलादेश ) ओळखपत्र, ढाका माध्यमिक शाळेचे प्रवेश पत्र, भारतीय आधारकार्ड, भारतीय मतदान ओळखपत्र,विविध पत्त्यांचे रेशनकार्ड आढळले असून त्यास जप्त करण्यात आले आहे. तिच्याजवळ आधार -व्होटर कार्ड केसे आले? ते कायदेशीर आहेत का? याचा तपास सुरु आहे.
या महिला आरोपीला पोलिसांनी एप कॅबचा कारभार सुरु करण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती २०२३ पासून जाधवपुरच्या विजयगड येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होती. ती वेगळ्या जागांवर रहात होती असेही उघडकीस आले आहे.
शांता हिच्या विरोधात ठाकुरपुकुर ठाण्यात फसणवूकीची तक्रार दाखल झाली होती. तिने बांग्लादेशाच्या दोन प्रसिद्ध कंपन्यांसाठी मॉडेल म्हणून काम केले होते. तिने अनेक सौदर्य स्पर्धात सहभाग घेतला होता.
मॉडेलचा बांगलादेशी पासपोर्ट जप्तयानंतर अटक महिलेजवळ अनेक बांगलादेशी पासपोर्ट सापडले आहेत. बांगलादेश माध्यमिकचे प्रमाणपत्र देखील सापडले आहे. एअरलाईन आयडी कार्ड देखील सापडले आहे. तिने कोणत्या कागदपत्रांद्वारे भारतीय आधारकार्ड आणि व्होटरकार्ड बनवले याचा तपास सुरु आहे. या संदर्भात यूआयडीएआय अधिकारी आणि निवडणूक आयोगाकडेचौकशी केली जात आहे.