संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल 17 वर्षांनी निकाल आला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, समीर कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीने सर्वांचे लवक्ष वेधले आहे.
“माझे 900 रुपये मला परत द्या“
मालेगाव बॉम्ब स्फोटामध्ये समीर कुलकर्णी यांनी बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप होता. आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी, ‘मला भोपाळमधून अटक करताना माझ्याकडून 900 रुपये काढून घेतले आणि रेकॉर्डवर साडेसातशे रुपये दाखवले. ते 900 रुपये मला परत मिळावेत. प्रश्न पैशांचा नाहीये‘ असे म्हटले. समीर कुलकर्णी असे म्हणताच कोर्टाने यावर उत्तर दिले आहे. ‘कोणताही मुद्देमाल परत देण्याचा कोर्टाचा आदेश नाही‘ असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
वाचा: महाराष्ट्र हादरला! महिलांना जंगलात नेऊन संबंध ठेवायचा, इच्छा पूर्ण होताच बनायचा यमराज; असा क्रूर खूनी कधी पाहिला नसेल
निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी व्यक्त केला आनंद
याप्रकरणात निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आता त्याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘मी आनंदी आहे कोर्टाच्या या निर्णयाने आमच्यावरचा डाग पुसला‘ असे रमेश उपाध्याय यांनी म्हटले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार दिली प्रतिक्रिया
‘जेव्हा हा खटला दाखल करण्यात आला तेव्हाच राज्य, देशामध्ये या विषयावर चर्चा झाली. काही निरपराध लोकांना गोण्याच्या प्रयत्न होत नाही ना? या खटल्यामध्ये काय राजकारण तर होत नाही ना? अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. आज जेव्हा निर्दोष मुक्तता झाली तरी यामध्ये तेव्हाच्या संदेह व्यक्त केला. त्यामध्ये काहीतरी तथ्य होतं. निर्दोष मुक्तता महामही न्यायाधीशांनी करणे व पुरावे जर त्यावेळेस सरकारने दिले असते तर गुन्हेगार कधी सुटले नसते आणि या माध्यमातून तेव्हाच्या शंका खरं ठरल्या‘ असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.