110 नातवंडे, पतवंडांच्या आजीने घेतला जगाचा निरोप, सर्वात वयस्कर महिलेच्या निधनाने अख्खा देश हळहळला
GH News August 01, 2025 05:12 PM

तुर्कीतील सर्वात वयोवृद्ध महिला मानल्या जाणाऱ्या होदी गुरकान यांचे सोमवारी निधन झाले. त्या तब्बल 131 वर्षांच्या होत्या. आग्नेय तुर्कीतील शानलिउर्फा प्रांतातील विरानशेहिर जिल्ह्यातील बिनेक्ली नावाच्या ग्रामीण भागात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गुरकानचे नाव अधिकृत लोकसंख्या नोंदींमध्ये नोंदवले गेले आहे आणि त्यानुसार त्यांचा जन्म 1 जुलै 1894 रोजी झाला होता. टर्की टुडेच्या वृत्तानुसार, त्यांनी त्यांच्या आयुष्यात तुर्कीच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे टप्पे पाहिले. ऑट्टोमन साम्राज्याची शेवटची वर्षे, तुर्कीयेचा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष, अता तुर्कने आधुनिक प्रजासत्ताकाची स्थापना आणि नंतर एका नवीन युगाची पहाट,अशा अनेक घटनांच्या त्या साक्षीदार होत्या.

गावात घालवलं संपूर्ण आयुष्य

मिळालेल्या माहितीनुसार, होदी गुरकान यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या जन्मगावी, बिनेक्ली येथे घालवले. हे गाव विरानशेहिर शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी एकूण सात मुलांना जन्म दिला, ज्यामुळे त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपर्यंत पसरले. आज तिच्या कुटुंबात 110 नातवंडे आणि त्याहूनही अधिक पणतवंडे आहेत. गावकऱ्यांसाठी ती फक्त एक वृद्ध महिला नव्हती तर जिवंत इतिहासाचं जणू एखादं पुस्तकचं होती. तिचे ज्ञान, अनुभव आणि कौटुंबिक मार्गदर्शनामुळे तिला खूप आदरणीय स्थान मिळाले.

गावातील आदरणीय वडीलधारी व्यक्ती

गुरकान ही महिला तिच्या गावात एक आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्ती होती. तिचे वय आणि अनुभव तिला समाजात महत्त्वाचे स्थान देत होते. बिनेकली येथील स्मशानभूमीत तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतिहासाची जिवंत साक्षीदार

होदी गुरकान यांचा जन्म तुर्कस्तानवर ऑट्टोमन साम्राज्याचे राज्य होते त्या काळात झाला. त्यांनी तुर्कस्तानचा स्वातंत्र्यलढा, नवीन प्रजासत्ताक निर्मिती आणि आधुनिक युगाकडे जाण्याचा दीर्घ प्रवास पाहिला. त्यांचा जीवन प्रवास तुर्कस्तानच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.