Nagpur News: १२ हजार घरांमध्ये आढळल्या डेंगी अळ्या; शहरात वाढत्या डेंगी, मलेरियाने मनपा सतर्क, 'ब्रिडिंग चेकर्स' सक्रिय
esakal August 01, 2025 06:45 PM

नागपूर : वातावरणातील बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. हा काळ डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया अशा कीटकजन्य आजारांसाठी पोषक असल्याने त्यांचा धोका वाढत आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या 'ब्रिडिंग चेकर्स’द्वारे मनपाच्या दहाही झोनअंतर्गत जून ते जुलै २०२५ या महिन्यात २ लाख ८५ हजार २३६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील १२ हजार २१ घरामंध्ये लार्वा (डास अळ्या) आढळल्या, त्या वेळीच मनपा कर्मचाऱ्यांकडून नष्ट करण्यात आल्या.

शहरात जानेवारीपासून आतापर्यंत डेंगी, मलेरियाचे प्रत्येकी अकरा, चिकनगुनीयाचे सहा रुग्ण आढळले. आगामी काळात या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे या आजारांबाबत झोनस्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत.

या हेतूने गुरुवारी (ता. ३१) अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी ‘ब्रिडिंग चेकर्स’ सर्वेक्षणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. मंगळवारी झोन अंतर्गत कोराडी मार्गावरील संत ज्ञानेश्वरनगर येथे केलेल्या पाहणीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

‘ब्रिडिंग चेकर्स’द्वारे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सदृश संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेट देऊन सर्वेक्षण केले जाते. घरातील पाणी साचलेली भांडी, साहित्य तपासले जाते. अशा ठिकाणी डास अळ्या आढळल्यास त्या नष्ट केल्या जातात. परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी केली जात आहे. खुल्या भूखंडामध्ये पाणी साचलेले आढळल्यास डास अळीनाशक तेल (एमएलओ ऑईल) टाकले जात आहे. या मोहिमेतून डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहे.

Ravindra Katolkar: बोगस शालार्थ आयडी घोटाळा गडद; माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्यावर कारवाईची शक्यता आजपासून आशा करणार घरोघरी सर्व्हेक्षण

नुकतेच मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आढावा बैठकीत डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांबाबत प्रभावी उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपाद्वारे शुक्रवार (ता.१) ऑगस्टपासून आशा सेविकांद्वारे घरोघरी सर्वेक्षणाला सुरुवात होत आहे. यासोबतच शहरातील वस्त्या, मोकळे भूखंड आणि घरोघरी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर देखील भर दिला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.