राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशातच महाराष्ट्रातील सोलापूर शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील एका प्रतिष्ठित खासगी शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर 56 वर्षीय शिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस चौकशी करत असून त्यांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 19 एप्रिल ते 3 जुलै या कालावधीत शाळेच्या पार्किंग क्षेत्रात घडला होता. आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकी दिल्याने तिने सुरुवातीला कोणालाही याबाबत सांगितले नव्हते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने तिला सातत्याने त्रास दिला. शेवटी विद्यार्थीने याबाबत शाळेतील इतर शिक्षकांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली.
वाचा: महाराष्ट्र हादरला! महिलांना जंगलात नेऊन संबंध ठेवायचा, इच्छा पूर्ण होताच बनायचा यमराज; असा क्रूर खूनी कधी पाहिला नसेल
धमक्या आणि अपमान
“तुला काहीच कळत नाही, तू काही कामाची नाहीस, दहावीत असूनही तुझ्यात काहीच बुद्धी नाही”, अशा शब्दांत आरोपी शिक्षक पीडित विद्यार्थिनीला वारंवार अपमानित करत होता. या धमक्यांमुळे ती घाबरली होती. मात्र, शाळेच्या प्राचार्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पावलं उचलली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीडितेने धैर्याने पुढे येत पोलिसांत तक्रार नोंदवली.
पोलिस कारवाई
या गंभीर प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी, सिद्धेश्वर मंदिर परिसरातील एका फिरस्त्या महिलेच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या हत्तुर वस्तीतील एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली होती. आता दहावी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थीनचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.