Devendra Fadnavis : कोणीच सर्व मुस्लिमांना दहशतवादी…देवेंद्र फडणवीस मालेगावच्या निकालावर काय म्हणाले?
Tv9 Marathi August 01, 2025 08:45 PM

“कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने हिंदू टेरर किंवा भगवा आंतकवाद अशा प्रकारच नरेटिव तयार केलेलं, ते बस्ट झालं आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आपल्याला कल्पना असेल 1990 च्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारणत: 2000 च्या सुरुवातीला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडल्या. अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादाच्या घटना घडल्या. भारतात तर घडतच होत्या. यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते. त्यातून इस्लामिक टेररिजमच नरेटिव तयार झालं. ते भारताने तयार केलं नव्हतं” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“भारतात या नरेटिवचा आपल्या वोटबँकेवर परिणाम होतोय हे काँग्रेसच्या लक्षात आलं. कोणीच सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवलं नव्हतं. पण तरीदेखील या ठिकाणी सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं यूपीएने षडयंत्र रचलं. हिंदू दहशतवाद हा शब्द तयार केला” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.

तुम्हाला ती वेळ माहित असेल

“2008 सालच षडयंत्र आता सर्वांसमोर उघड झालय. त्यावेळच्या सरकारने मतांच्या राजकारणासाठी हिंदू टेरर, भगवा दहशतवाद हे शब्द तयार केले. तुम्हाला ती वेळ माहित असेल, ज्यावेळी संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडत होत्या. एकप्रकारे इस्लामिक दहशतवाद चर्चेचा विषय होता” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

म्हणून हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली

“आम्हाला मतदान करणारे जे लोक आहेत, त्यांच्या मनात राग निर्माण होऊ नये किंवा त्यांना वाटावं आम्ही बॅलन्स करतोय, यासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवण्यात आली. लोकांना अटक केली. हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी, पदाधिकारी यांना टार्गेट करण्याचं हे षडयंत्र होतं. त्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले” असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही असं करणार नाही

“ठोस पुरावे त्यांना मिळाले नाही. अनेक अधिकारी असे होते, ज्यांच्यावर भरपूर दबाव टाकण्यात आला. त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही असं बेकायद काम करणार नाही. हे षडयंत्र हळूहळू बाहेर येत आहे. त्यावेळी इस्लामिक दहशतवाद होता, आजही आहे. पण असं कोणी म्हटलं नव्हतं की, सर्व मुस्लिम दहशतवादी आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनेक गंभीर गोष्टी बाहेर येतील असं ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.