केळ्याच्या सालींमध्ये पोटॅशिअम, फॉस्फरस आणि कॅल्शिअम सारखे पोषक घटक भरपूर असतात, जे वनस्पतींची मुळे मजबूत करतात आणि नवीन पानांच्या वाढीस मदत करतात. सालांचे लहान तुकडे करा आणि मातीत पुरा किंवा पाण्यात भिजवा आणि 2-3 दिवसांनी ते पाणी झाडांना घाला . ( Photos : Unsplash and Getty Images)
वापरलेली चहाची पावडर ही देखील वनस्पतींसाठी चांगली मानली जाते. ही पावडर, मातीला सेंद्रिय पदार्थ आणि किंचित आम्लयुक्त घटक प्रदान करतात, जे विशेषतः फुलांच्या रोपांसाठी फायदेशीर आहे. चहा तयार झाल्यानंतर उरलेली जी पावडर असते ती वाळवा आणि मग थेट मातीत मिसळा किंवा खतामध्ये मिसळा. पण वापरण्यापूर्वी ती पावडर स्वच्छ धुवून वाळवा, जेणेकरून त्यात दूध किंवा साखरेचा अंश उरणार नाही.
अंड्यांचे साल किंवा कवचांमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते आणि झाडे मजबूत होतात. ती सालं झाडांना घालणं चांगलं. यासाठी, अंड्याचं वरच कवच धुवून वाळवा आणि नंतर बारीक करा आणि मातीत मिसळा किंवा थेट कुंडीच्या पृष्ठभागावर ठेवा.
भाज्यांच्या सालांमध्येही अनेक प्रकारची खनिजे आणि तंतू असतात, जे मातीला सुपीक बनवतात. या सालींचा वापर कंपोस्ट बनवून किंवा कुंडीच्या मातीत थोड्या प्रमाणात पुरून करा. मात्र त्यात कुजलेले भाग नाहीत नायाची खात्री करा.
तांदळाच्या पाण्यात स्टार्च आणि काही खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे झाडांच्या वाढीस मदत करतात. तांदूळ धुतल्यानंतर उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी ते थंड करा आणि झाडांवर ओता. पण त्यात मीठ किंवा मसाले नसावेत याची काळजी घ्या.