सगळ्याच कशा कुंवाऱ्या…? जगातलं कुमारिकांचं अनोखं गाव, 1 अट ऐकून मुलं ठोकतात धूम !
Tv9 Marathi August 01, 2025 11:45 PM

आपल्या भारत देशासह जगात अशी अनेक गावे आहेत जिथे त्यांच्या परंपरा आणि चालीरीती, या त्यांना इतर सर्वांपेक्षा वेगळे बनवतात. पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांवर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे, परंतु या अनोख्या परंपरा या ठिकाणाचा इतिहास अबाधित ठेवतात. आज आपण जगातील अशाच एका अनोख्या गावाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे शेकडो मुली अविवाहित बसल्या आहेत. लग्नासाठी इथे येणारी मुलं त्यांची एक अट ऐकताच तेथून लगेच पळून जातात.

खरंतर या अनोख्या गावाचे नाव नोइवा दो कॉर्डेइरो (Noiva do Cordeiro) आहे, त्या गावाची कहाणी सर्वांनाच आश्चर्यचकित करते. हे गाव त्याच्या परंपरा, संस्कृती आणि जीवनशैलीमुळे अनेकदा चर्चेत असते. ब्राझीलच्या आग्नेय भागात वसलेले हे गाव हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे, परंतु येथे राहणाऱ्या सुमारे 600 मुली अजूनही अविवाहित आहेत. त्यांना लग्नासाठी योग्य वर सापडतच नाही.

माध्यमांच्या माहितीनुसार, या गावातील मुली 20 ते 35 वयोगटातील आहेत, ज्या सुशिक्षित, कष्टाळू आणि स्वावलंबी आहेत. गावात त्या शेतीचे काम करतात तसेच घराची काळजी घेतात. एवढंच नव्हे तर त्या एकमेकांसबत एकोप्याने राहतात. त्यांना स्वातंत्र्य आवडते. या गावातील मुली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. सामाजिकदृष्ट्याही त्या मजबूत आहेत.

मग अविवाहीत का ?

मात्र या तरूणी आतापर्यंत अविवाहित राहण्याचे कारण म्हणजे या मुलींची परिस्थिती. ज्या अंतर्गत लग्नानंतर पतीने त्यांच्या गावात येऊन स्थायिक व्हावं लागतं आणि त्या गावच्या स्थानिक नियम आणि संस्कृतीचे पालन करावे, अशी अट असते. लग्नासाठी त्यांना पहायला येणाऱ्या तरूणांना, या मुली स्पष्टपणे सांगतात की लग्नानंतर त्यांना त्यांचे गाव, स्वातंत्र्य आणि त्यांच्या ठिकाणाचे नियम सोडायचे नाहीत.

एवढंच नव्हे तर या तरूणींना, पुरुषांद्वारे बनवलेले नियम पाळण्यात रस नाही. त्यांना स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचे आहे. हेच कारण आहे की, त्यामुळे त्यांना अजूनही एकटेच आयुष्य जगावे लागते. काही वर्षांपूर्वी, या गावातील मुलींनी जगभरातील अविवाहित मुलांना प्रस्ताव पाठवले होते, त्यांच्याशी लग्न करून येथेच स्थायिक होण्याची विनंती केली होती, परंतु कोणताही मुलगा, तरूण ही अट मान्य करण्यास तयार नव्हते. म्हणूनच आत्तापर्यंत, या गावातील बहुतेक मुली अविवाहित आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.