पलूस: संगनमत करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पलूस शाखेस खोटे प्रमाणपत्र व खोटे सोने तारण देऊन त्याद्वारे घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता तिघांनी बँकेची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पलूस शाखेतून २५ ते १६ या कालावधीत राजेंद्र विठ्ठलराव यादव (रामापूर, ता. कडेगाव), राजेंद्रकुमार संपतराव शिंदे (पलूस) व सुधाकर शिवाजी सूर्यवंशी (पलूस) यांनी संगनमत करून स्वतःच्या व कर्जदार यांच्या फायद्यासाठी २०४.१३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन, खोटे सोने तारण देऊन, त्याद्वावारे कर्जदारांनी ७ लाख ६० हजार रुपये कर्ज घेऊन ते न फेडता बँकेची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद गोरख मच्छिंद्र पाखरे (वय ४०, परांजपे कॉलनी, पलूस) यांनी पलूस पोलिस ठाण्यात दिली आहे. तिघांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.