Maharashtra Politics Live Update : शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरे-संजय राऊत एकाच व्यासपिठावर
Sarkarnama August 02, 2025 05:45 PM
Raj Thackeray : शेकापच्या मेळाव्याला राज ठाकरेंनी हजेरी

शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापचा 78 वा वर्धापन दिन यंदा पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. आज 2 ऑगस्टला नवीन पनवेल येथे शेकापचा वर्धापन दिन मेळावा होतोय. दरम्यान, विशेष म्हणजे या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मंचावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील दिसणार आहेत. कारण पनवेलमधील शेकापच्या मेळाव्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे. यावेळी एकाच मंचावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे एकाच मंचावर बाजू-बाजूला बसल्याचे पाहायला मिळातंय.

पंकजा मुंडेंच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे या कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज (दि. २) त्यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केली.

शेकाप पक्ष जिवंत आहे, हे या मेळाव्यात दिसेल

शेतकरी कामगार पक्षाचा आज 78 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. पनवेल येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेकाप पक्ष जिवंत आहे, हे या मेळाव्यात दिसेल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांनी दिली.

तर तुम्हाला सोडणार नाही, रोहित पवारांचा नव्या कृषीमंत्र्यांना इशारा

वाकडं काम केलं तर तुम्हाला सोडणार नाही असा इशारा रोहित पवार यांनी नवनियुक्त कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे. वाकडं करतात त्यांचीच नोंद माणसं ठेवतात असं कृषीमंत्री भरणेंनी म्हटलं होतं. त्यावर रोहित पवारांनी त्यांना हा इशारा दिला आहे.

शेकापच्या मेळाव्याला राज ठाकरे व संजय राऊत दोघांची हजेरी असणार

शेतकरी कामगार पक्षाचा आज 78 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. पनवेल येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांच्यासह शेकापची सर्व नेतेमंडळी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे.

माजी आमदाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना 10 कोटींची खंडमी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी धमकी देणारा आरोपी दिलशान खान याला अटक केले आहे. मुंबई विमानतळावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

शेकापच्या वर्धापन दिनाला राज ठाकरे मार्गदर्शन करणार

शेतकरी कामगार पक्षाचा आज (शनिवार) वर्धापन दिन पनवेलमध्ये साजरा केला जाणार आहे. त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज शिक्षा सुनावणार

कर्नाटकमधील राजेडी पक्षाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा हे घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. न्यायालायाने या संदर्भात आज निकाल देणार आहे.

रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या आज शरद पवार यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. रोहिणी खडसे यांनी पोलिसांवर आरोप करत त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या शरद पवारांच्या भेटीला वेगळेच महत्त्व आले आहे.

लाडक्या बहिणींना आठ ऑगस्टला मिळणार निधी

जुलै महिन्याचा माझी लाडकी बहिणी योजनेचे 1500 रुपये निधी आठ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. 9 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला निधी महिलांना मिळणार आहे.

यवत दंगल प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार - अजित पवार

यवत प्रकरणातील दोषींवर योग्य ती आणि कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी मी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा अत्यंत दक्ष आहे व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जमावबंदी लागू करण्यात आलेली असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करत संयमानं राहावं, असं मी सर्वांना आवाहन करतो. जातीय सलोखा टिकवून ठेवणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन अजित पवार यांनी यवतमध्ये झालेल्या दोन गटातील हिंचासाराच्या पार्श्वभूमीवर आवाहन केले आहे.

सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून खून

ईश्वरपूर (पूर्वीचे इस्लामपूर) शहरात भरदिवसा तिघा जणांनी एका रोहित पंडित पवार या रेकाॅर्डवरील आरोपीचा पाठलाग करत खून केला. हल्लेखोरांमध्ये आणि रोहितमध्ये आर्थिक देवाणघेवाणमधू वाद होता. रोहित यांच्या मानेवर डोक्यावर आरोपींनी शस्त्रांनी हल्ला केला त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला

खासदारांना रोखण्यासाठी संसदेत कमांडो बोलवले

शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बिहार मतदारयाद्या पुनरावलोकनावरून चर्चा होती. राज्यसभेत सरकारविरुद्ध आक्रमक सदस्यांना रोखण्यासाठी थेट सरकारकडून थेट कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. खासदार प्रमोद तिवारी यांनी हा लोकशाहीतील काळा दिवस असल्याचे म्हणत सरकारचा निषेध केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.