‘हम दो हमारे दो’ अशी एक म्हण आपल्याकडे खूपच लोकप्रिय आहे. तर चीनमध्ये गेल्या काही काळापर्यंत हम दो हमारे एक असं चलन होतं. तसंही आजच्या प्रचंड महागाईच्या जमान्यात कोणीच 1 किंवा 2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घालत नाहीत. पण आज आपण एका अशा महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या घरात एक अख्खी, संपूर्ण क्रिकेटची टीमच आहे, म्हणजेच तिची एकूण 11 मुलं आहेत.
8 पुरुषांशी संबंध, 11 मुलं…
जर तुम्हाला 11 मुलांबद्दल ऐकून आश्चर्य वाटलं असेल, तर एक मिनिट थांबा, कथेत खरा ट्विस्ट अजून यायचा आहे. या महिलेला 11 मुलं तर आहेत, ती देखील 8 वेगवेगळ्या पुरुषांपासून. एवढंच नव्हे तर ती महिला लवकरच आणखी 19 मुले जन्माला घालण्याची योजना आखत आहे, म्हणजेच तिला एकूण 30 मुलं होतील. वेगवेगळ्या पुरूषांशी संबंध ठेवून एवढी नुलं जन्माला घालण्यामागंच एक कारणंही त्या महिलेने सांगितलं आहे. ते ऐकून तर तुम्ही लोटपोट व्हाल.
खरंतर, सध्या सोशल मीडियावर एक टिकटॉक सेलिब्रिटी व्हायरल होत आहे. या महिलेचे नाव फाई आहे, जी अमेरिकेतील टेनेसी येथील मेम्फिस येथे राहते. फाई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिथे तिचे 90 हजार पेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. 11 मुलं असल्यामुळे तिला अनेकदा टीकेचा, ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
सर्वांना असं करते मॅनेज
काही लोकांनी महिलेवर असाही आरोप लावला की सरकारी भत्त्यातून मिळणाऱ्या मदतीने घर चालवता यावे म्हणून तिने इतक्या मुलांना जन्म दिला. पण त्या महिलेने लोकांना सरळ एक सरकारी कागद दाखवून गप्प केलं. त्यात लिहिलं होतं की तिला तिच्या मुलांसाठी मदत म्हणजेच चाइल्ड सपोर्ट म्हणून सरकारकडून दरमहा फक्त 10 डॉलर प्रती मिळतात.
तू इतक्या मुलांचा सांभाळ, संगोपन कसं करतेस असा सवालही काही यूजर्सनी तिला विचारला. ती (मुलं) तुला त्रास देत नाहीत का?, असंही काहींनी विचारलं. त्यावर त्या महिलेने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्या महिलेची सगळीच मुलं एकदम आनंदाने नाचत होती. तिची मुलं एकत्रच, आनंदाने राहतात हेच ती महिला यातून दाखवू इच्छित होती.
वेगवेगळ्या पुरूषांकडून मुलं का ?
आता शेवटचा प्रश्न अजूनही उरतोच की त्या महिलेला 8 वेगवेगळ्या पुरुषांपासून इतकी मुलं का झाली? महिलेने याचे उत्तर अतिशय मजेदार पद्धतीने दिले. तिने सांगितले, तिच्या मुलांवर नेहमीच वडिलांची सावली राहावी असं तिला वाटतं. त्यामुळे त्यांच्या 8 वडिलांपैकी दोन किंवा चार पिता जरी गेले (दुसऱ्या स्त्रीकडे गेले किंवा मरण पावले), तरी दुसऱ्या वडिलांचे मुलांवर नियंत्रण राहील असं स्पष्टीकरण तिनं दिलं.
त्या महिलेने एक उदाहरण देऊन तिचा तर्कही स्पष्ट केला. ती म्हणाली की जर तुमच्याकडे 5 आवश्यक वस्तू असतील आणि त्यापैकी 2 हरवल्या तरी तुमच्याकडे 3 वस्तू शिल्लक राहतील. यामुळे तुमचे काम थांबणार नाही. म्हणजे एकंदरीत त्या महिलेने बॅकअप प्लॅन म्हणून इतक्या पुरुषांपासून इतकी मुले जन्माला घातली. तसं तर, त्या महिलेने असंही म्हटलं आहे की, ती आणखी 19 मुले जन्माला घालेल. पण नंतर ती म्हणाली, की ती फक्त मस्करी करत्ये.