Naresh Mhaske: संसदेच्या बाहेर लोक गोळा करायचे अन् बालिश चाळे...; शिंदे खासदाराची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
esakal August 03, 2025 06:45 AM

ठाणे : पालघर येथे साधूंची हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यावेळी उद्धव ठाकरे, राहुल गांधी अथवा पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे सनातन धर्माचा अपमान करणाऱ्य उद्धव ठाकरेंचा असली चेहरा हा हिंदूंच्या विरोधी असल्याची टीका शिवसेना खासद्र नरेश म्हस्के यांनी केली. तसेच हिंदूंवर आरोप करणे सोपे आहे. हिंमत असेल तर दहशतवादांविरोधात वक्तव्य करण्याचे धाडस ठेवा असे आवाहन करीत, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील नरेश म्हस्के यांनी केली.

ठाण्यातीलआनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही टीका केली. यावेळी, माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माला चुकून आतंकवाद म्हटले नाही, तर जाणूनबुजून म्हटले असल्याचा आरोप देखील म्हस्के यांनी केला. हिंदुंवर आरोप करणे सोपे आहे, इस्लामी दहशतवाद या विषयी आवाज का उठवत नाही असा सवाल उपस्थित करीत, निवडणुकीची भीती वाटते? अल्पसंख्याकांची मते मिळणार नाहीत याची भीती वाटते असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले.

Mumbai Crime: ३ पतींनी सोडलं, प्रियकरापासून गर्भवती राहिली, नंतर असं काही गुपित कळलं अन् आईनं ६ महिन्यांच्या लेकराला संपवलं राहुल गांधी यांच्यावर आरोप

लोकसभा निवडणुकीत घटना बदलणार असल्याचा प्रचार केला, तर विधानसभा निवडणुकीत पराजय झाल्यानंतर निवडणूक आयोगावर ठपका ठेवत असून मतदार याद्यांवर आक्षेप घेत आहे, याचा अर्थ चुकीचा नरेटिव्ह या देशात पसरवण्याकरिता व सहानभूती मिळविण्यकरिता अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप म्हस्के यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. जर, त्यांच्याकडे ॲटम बॉम्ब असेल तर, त्यांनी तो फोडावा घरात कशाला ठेवताय, घरातच फुटला तर नुकसान तुमचंच होईल, असे देखील म्हस्के यांनी म्हंटले आहे. संसदेच्या बाहेर लोक गोळा करायची आणि बालिश चाळे करायचे याला राजकारण म्हणत नाही, अशी देखील टीका त्यांनी केली. देशाची कोणी मस्करी करत असेल तर, देशाचा नुकसान करत असेल देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे. असे असताना ते याविरुद्ध आनंद व्यक्त करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

राज साहेबांच्या मताशी ते सहमत आहेत का?

पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यक्रम आहे. राज ठाकरे त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांनी त्यांचा मुद्दा मांडलेला आहे. कालपर्यंत समाजवादी म्हणणाऱ्यांनी फक्त मराठीच्या मुद्द्यावर राज साहेबांच्या मताशी ते सहमत आहेत का असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांनीच गुजरातचे कौतुक केले होते. जर, महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला गेले असतील तर, ते परत आणले पाहिजेत असे देखील त्यांनी सांगितले.

Thane News: ठाणे जिल्ह्यात परिवहन सेवेची चाके थांबली, चालकांचा संप; सर्वसामान्यांचे हाल संजय राऊत हे राहुल गांधींच्या घरी पाणी भरतात

संजय राऊत हे राहुल गांधींच्या घरी पाणी भरायला आहेत हे माहिती आहे का तुम्हाला असा सवाल करीत, संजय राउत यांचे राज्यसभेचे सदस्यत्व संपणार आहे. काँग्रेसने मदत केली तरच ते राज्यसभेवर येणार आहेत. त्यामुळे जे राहुल गांधी म्हणणार त्याला संजय राऊत दुजोरा देणार असा टोला देखील म्हस्के यांनी यावेळी लगावला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.