IND vs ENG 5th Test: भारताने रचला विजयाचा पाया; यशस्वी जैस्वालच्या शतकाने इंग्लंडची भंबेरी, उभं केलं गाठता न येणारं लक्ष्य
esakal August 03, 2025 08:45 AM

England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारत-इंग्लंड यांच्यातली पाचवी कसोटी रोमांचक वळणावर आहे. इंग्लंडने पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी गमावली आणि तेच पहिल्या डावात ढेपाळलेली टीम इंडियाने दुसऱ्या डावात जबरदस्त खेळ केला. यशस्वी जैस्वालच्या शतकाला, आकाश दीप,, वॉशिंग्टन सुंदर व रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांची साथ मिळाली. इंग्लंडसमोर तगडे आव्हान उभे करण्यात भारताला यश आले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा इंग्लंडने १ बाद ५० धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी ३२४ धावांची गरज आहे.

लोकेश राहुल ( ७), साई सुदर्शन ( ११), शुभमन गिल ( ११) व करुण नायर ( १७) हे माघारी परतल्यानंतर अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला यशस्वीने सावरले. त्याने आधी आकाश सह १०७ ( १५० चेंडू) धावांची भागीदारी करून भारतीय संघात सकारात्मत वातावरण निर्माण केले. तळाच्या फलंदाजांनीही त्याला चांगली साथ दिली. यशस्वी १६४ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह ११८ धावांवर बाद झाला. यशस्वीने नायर ( ४०), जडेजा ( ४४) यांच्यासह महत्त्वाच्या भागीदारी केल्या. जड्डू व ध्रुव जुरेल यांनी मोर्चा सांभाळला आणि ७२ चेंडूंत ५० धावा जोडल्या.

IND vs ENG 5th Test: सर रवींद्र जडेजाने इतिहास रचला! एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम केला; जगातील दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

ध्रुव ४६ चेंडूंत ३४ धावांवर बाद झाला. जडेजाने अर्धशतक पूर्ण करताना चांगली टक्कर दिली, परंतु जोश टंगने त्याला बाद केले. जडेजा ७७ चेंडूंत ५ चौकारांसह ५३ धावांवर बाद झाला. इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये जडेजाने तिसरे स्थान पटकावले. त्याने ११५८ धावांसह सुनील गावस्करांना ( ११५२) मागे टाकले. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( १५७५ ) व राहुल द्रविड ( १३७६) हे पुढे आहेत.

रवींद्र जडेजाने या मालिकेत आतापर्यंत ५१६ धावा केल्या आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत. विनू मंकड यांनी १९५५ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ५२६ धावा व १२ विकेट्स घेतल्या होत्या. जड्डूला विकेट्सचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याच षटकात मोहम्मद सिराजही भोपळ्यावर पायचीत झाला. साई सुदर्शन, गिल व जुरेल यांनी गरज नसताना DRS वापरले आणि त्याचा फटका सिराजला बसला. त्याने DRS घेतला असता तर तो नाबाद राहिला असता.

IND vs ENG 5th Test: Yashasvi Jaiswal-केएल राहुलने दौरा गाजवला! ७० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला अन् नोंदवले ५ मोठे पराक्रम

दी ओव्हलमध्ये चौथ्या डावात २६३ धावांचा यशस्वी ( इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, १९०२) पाठलाग करता आलेला आहे. २०२४ मध्ये श्रीलंकने २१९ धावांचा पाठलाग केला होता. वॉशिंग्टन सुंदरने मोर्चा सांभाळताना ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. भारताचा डाव ३९६ धावांवर गुंडाळला गेला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. सुंदरने ४६ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावा केल्या. टंगने पाच, तर एटकिन्सनने तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात पन्नास धावांवर पहिली विकेट गमावली आहे. झॅक क्रॉलीला ( १४) मोहम्मद सिराजने माघारी पाठवले, तर बेन डकेट ३४ धावांवर नाबाद आहे.

ओव्हल येथे चौथ्या डावातील सर्वाधिक ३४०+ कसोटी धावा
  • ४२९/९ भारत १९७९ (ड्रॉ)

  • ४२३/७ दक्षिण आफ्रिका १९४७ (ड्रॉ)

  • ३६९/६ इंग्लंड २००७ (ड्रॉ)

  • ३४८/१० ऑस्ट्रेलिया २००९ पराभूत

  • ३४५/१० भारत २०१८ पराभूत

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.