जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे ओव्हल कसोटीत खेळलेला नाही.
बुमराहला भारतीय संघातून मुक्त करून मायदेशी पाठवण्यात आले आहे.
बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल प्रसिद्ध कृष्णाने पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.
भारत आणि इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना केनिंग्टन ओव्हल मैदानात खेळला जात आहे. पण या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आलेली नाही. त्याला वर्कलोडच्या कारणाने या सामन्यात खेळवले नसून संघातूनही मुक्त करण्यात आले आहे.
ENG vs IND, 5th Test: भांडणं झाली पण तरी जो रुट - करुण नायरच्या त्या कृतींनी जिंकली लाखो चाहत्यांची मनं; पाहा नेमकं काय झालंबुमराह संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने या मालिकेत खेळलेल्या तिन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याने दोनदा डावात ५ विकेट्सही घेतल्या आहेत. ओव्हलवर वेगवान गोलंदाजांना पोषक वातावरण असतानाही त्याला खेळवण्यात न आल्याने बऱ्याच चर्चाही झाल्या. आता त्याच्या उपलब्धतेवर प्रसिद्ध कृष्णाने प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसिद्ध कृष्णाला इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत खेळवण्यात आले होते. पण नंतरच्या दोन कसोटी त्याला खेळवले नाही. पण पाचव्या कसोटीत पुन्हा त्याचे पुनरागमन भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले आहे. त्याला पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसानंतर पत्रकार परिषदेच बुमराहच्या उपलब्धतेवर प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच त्याच्या असण्याचा आणि नसण्याचा संघावर कसा परिणाम होतो?
याबाबत प्रसिद्ध कृष्णा म्हणाला, 'बुमराह खेळत असो वा नसो, आम्ही सर्व वेगवान गोलंदाज, खरंतर सर्वच गोलंदाज एकमेकांसोबत बराचवेळ घालवतो. आम्हाला प्रत्येकाला माहित आहे की कोणाला कधी संधी मिळणार आहे. तो खेळत असो किंवा नसो, मला वाटतं प्रत्येक गोलंदाजाला त्यांची भूमिका काय आहे, हे माहित आहे.'
ENG vs IND: फक्त रुट-प्रसिद्धच नाही, तर साई सुदर्शन अन् बेन डकेटमध्येही उडाले खटके! विकेटनंतरच्या वादाचा Video Viralतो पुढे म्हणाला, 'बुमराह जेव्हा संघात असतो, तेव्हा तुम्हाला माहितच आहे की तो किती फायदेशीर असतो आणि जेव्हा तो नसतो तेव्हा एक आव्हान असते की तुम्हाला प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे टाकायचे असते आणि तुमच्या हातात चेंडू असतो.'
प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पहिल्या डावात शानदार गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेतल्या. त्याने या मालिकेत आत्तापर्यंत १० विकेट्स घेतल्या आहेत.
FAQs१. जसप्रीत बुमराह ओव्हल कसोटीत का खेळत नाही?
(Why is Jasprit Bumrah not playing the Oval Test?)
– वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणाने बुमराहला ओव्हल कसोटीत विश्रांती देण्यात आली आहे.
२. प्रसिद्ध कृष्णाने बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल काय म्हटलं?
(What did Prasidh Krishna say about Bumrah’s absence?)
– बुमराह खेळो वा न खेळो, प्रत्येक गोलंदाज आपली भूमिका जाणतो, असे प्रसिद्ध कृष्णा म्हणाला.
३. प्रसिद्ध कृष्णाची पाचव्या कसोटीत पहिल्या डावातील कामगिरी कशी होती?
(How did Prasidh Krishna perform in the 5th Test?)
– प्रसिद्ध कृष्णाने पाचव्या कसोटीत पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या.