सासवड शहर, ता. ४ : श्रीक्षेत्र अरण येथे रविवारी (ता. ३) सासवड येथील संत सोपानदेव मंदिरातून संत शिरोमणी सावता महाराज पायी पालखी सोहळ्याने २५ जुलै रोजी प्रस्थान ठेवले होते. हा पालखी सोहळा अरण येथे पोहोचला असून तेथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सकाळी दिलीप महाराज झगडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांच्या वतीने महाप्रसाद आणि काल्याच्या कीर्तनाने पायी पालखी सोहळ्याची सांगता झाली.
या सोहळ्यासाठी सासवड येथून गणेश महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक सासवड येथून रवाना झाले होते. या ट्रॅव्हल बस सोबत वकील भगवान होले, सुधाकर गिरमे, रवींद्र क्षीरसागर, गिरमे, निवृत्ती गिरमे, बाळासाहेब राऊत, कानिफनाथ राऊत, अरविंद म्हेत्रे, मंगल म्हेत्रे, बाजीराव इनामके, वामन भोंगळे, पांडुरंग भोंगळे, बापूराव बोरावके उपस्थित होते.