-rat३p२१.jpg-
२५N८१८६८
रत्नागिरी ः दामले विद्यालयात झालेल्या बालनाट्य दिनाला उपस्थित बालकलाकार व मान्यवर.
-----
दामले विद्यालयात बालनाट्य दिन
रत्नागिरी, ता. ४ ः बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे मराठी बालनाट्य दिन दामले विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक भगवान मोटे व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्यवाह समीर इंदुलकर यांच्या हस्ते नटराज पूजन झाले.
सर्व निमंत्रित पाहुण्यांना गुलाब पुष्प आणि बालकवी लिखित काव्यसंग्रह भेट देण्यात आले. या वेळी बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, कार्यवाह सीमा कदम, कोषाध्यक्ष शौकत गोलंदाज, कार्यकारिणी सदस्य तेजस्विनी जोशी, सल्लागार राजकिरण दळी, सभासद आणि युथ टीम सदस्य शहाबाज गोलंदाज, सागर सकपाळ, योगेश कदम, निरंजन सागवेकर, सई कदम आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर ‘धोंड’ या बालनाट्याचे अभिवाचन करण्यात आले. यामध्ये अर्षती कारेकर, स्वरा कदम, ईशा चव्हाण, श्रेया गंधारे, सोहम कदम, श्रवण महाले, गंधार संसारे, श्रेया दसुरकर, अनन्या देवस्थळी आणि गार्गी या बालकलाकारांनी सहभाग घेतला. या सर्व बाल कलाकारांना शाखेतर्फे काव्यसंग्रह देऊन गौरविण्यात आले.