Raj Thackeray : शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरेंचं सूचक विधान...मतदार यादीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना, नेमकं काय म्हणाले?
esakal August 04, 2025 08:45 PM

MNS leaders instructed to monitor voter lists and resolve internal conflicts : मुंबईत आज पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. “मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, पण हे करत असताना हिंदीची किंवा कोणत्याही भाषेची द्वेष करू नका,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. तसेच त्यांनी शिवसेनेशी युतीबाबतही सूचक विधान केलं.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना एकजूट, आत्मविश्वास आणि संघटनबांधणीवर भर देण्याचेही आवाहन केले. “स्थानिक पातळीवर आत्मविश्वासाने आणि एकत्र येऊन काम करा. नव्या पदाधिकाऱ्यांना स्वीकारा. आपापसातली भांडणं, मतभेद मागे टाका आणि एकजुटीने पुढे चला असं ते म्हणाले. २० वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकत्र का येऊ शकत नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray: एकदा अटक करून दाखवा, राज ठाकरेंचे सरकारला खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

यावेळी बोलताना, राज ठाकरे यांनी शिवसेनेशी संभाव्य युतीबाबतही सूचक विधान केले. ते म्हणाले, "युतीचं काय करायचं, ते माझ्यावर सोडा. याबाबत मी योग्य वेळी मी बोलणार आहे," यावेळी बोलताना त्यांनी मुंबई महानगर पालिकेत १०० टक्के सत्ता मिळवण्याच विश्वासही व्यक्त केला.

Raj Thackeray : शिवरायांच्या रायगडात डान्सबारांचा सुळसुळाट, मराठी माणसांच्या जमिनी धोक्यात! राज ठाकरेंचा संताप

या मेळाव्याबाबत बोलताना मनसेनेते बाळानांदगावकर म्हणाले, “राज ठाकरे यांनी अनेक संघटनात्मक मुद्द्यांवर स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत. मनपा निवडणुकीसाठी तयारीला लागा, मतदार यादीवर लक्ष ठेवा, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांचा सन्मान राखावा आणि माजी पदाधिकाऱ्यांनादेखील सोबत घ्यावा, असं राज ठाकरे यांनी म्हटल्यांचही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.