मनोरंजनसृष्टीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
प्रसिद्ध गायकाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.
गाडी थेट डिव्हायडरला धडकली आहे.
मनोरंजनसृष्टीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायकाचा अपघात झाला आहे. हा गायक दुसरा-तिसरा कोणी नसून पंजाबी इंडस्ट्री गाजवणारा लोकप्रिय गायक हरभजन मान आहे. एका कार्यक्रमातून चंदीगडला परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. हरभजन मान याने आजवर आपल्या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.
View this post on InstagramA post shared by Harbhajan Mann (@harbhajanmannofficial)
हरभजन मानच्या (Harbhajan mann ) कारला एक भयानक अपघातझाला असून मिळालेल्या माहितीनुसार, गायक दिल्लीत एक कार्यक्रम करून चंदीगडला परतत होता. तेव्हा त्यांची गाडी पिपली उड्डाणपुलावर एका डिव्हायडर धडकली. अपघातात गायक थोडक्यात बचावला आहे. डिव्हायडरला धडकल्यानंतर गाडी उलटली झाली. त्यानंतर मागून एक गाडी आली. त्यात सुरजीत सिंग नावाची व्यक्त होती. तिने गायकहरभजन मान आणि त्याच्यासोबत कारमधील चार जणांना वाचवले.
अपघातात हरभजन मानला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही आहे. परंतु त्याच्या सुरक्षा रक्षकाला मोठी दुखापतझाली आहे. अपघाताच्या वेळी हरभजनच्या गाडीत त्याच्याशिवाय चार जण होते. यात मॅनेजर, ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. घटनेनंतर हरभजन मान चंदीगडला रवाना झाला. त्याची प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे.
View this post on InstagramA post shared by Harbhajan Mann (@harbhajanmannofficial)
हरभजन मान हा पंजाबी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक आहे. ज्याने आपल्या गोड आवाजाने इंडस्ट्री गाजवली आहे. त्याच्या स्टेज शोसाठी कायम प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. त्याचे चाहते परदेशातही आहेत.
Priyanka Chopra : प्रियंकाच्या लेकीचा क्युट अंदाज, स्वतः कॅमेरा पकडून वडिलांचा VIDEO केला शूट