इरदाई दंड धोरण बाजार: भारतीय विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आयआरडीएआयनं विमा वेब एग्रीगेटर पॉलिसी बाजारवर विमा अधिनियम 2017 च्या उल्लंघनामुळं 5 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. याशिवाय पॉलिसी होल्डर्सकडून दिल्या जाणाऱ्या प्रीमियमचं पेमेंट विमा कंपन्यांकडं वेळेवर न पाठवल्यानं कंपनीवर 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे.
आयआरडीएआयच्या नुसार 1 ते 5 जून 2020 च्या दरम्यान पॉलिसी बाजारच्या IWA वेबसाईटच्या पाहणीत दिसून आलं की त्यावर केवळ ULIP प्लान्स म्हणजेच बजाज अलियान्झ गोल एश्योर, एडेलवाइस टोक्यो वेल्थ गेन +, एचडीएफसी Click2Wealth, एसबीआय लाइफ e-Wealth Insurance आणि आयसीआयसीआय सिग्नेचरला दाखवलं जात आहे. पॉलिसीबाझारकडे इतर कंपन्यांचे ULIP प्लॅन उपलब्ध असून देखील ते प्रदर्शित केले जात नव्हते.
याला उत्पादनाचं भेदभावपूर्ण प्रमोशन असं पाहिलं गेलं. मंगळवारी पीबी फिनटेकनं स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये सांगितलं गेलं की हा दंड प्रमुख व्यवस्थापन अधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांद्वारे करण्यात जी संचालक म्हणून भूमिका पार पाडण्यात आली, आऊटसोर्सिंग करार, उत्पादन प्रदर्शन, प्रिमियम रेमिटेन्स आणि पॉलिसीच्या टॅगिंगसंदर्भातील नियमांचं केल्यामुळं दंड आकारण्यात आला आहे.
आयआरडीएआयनं पॉलिसी बाझारला सल्ला दिला की त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं सर्व निर्देश आणि सल्ल्याचं पालन करावं. पॉलिसी बाझारनं सांगितलं की IRDAI नं जून 2020 ला पाहणी केली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2024 ला कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.
IRDAI नं पीबी फिनटेकवर दंड आकारल्यानं त्याचा थेट परिणाम कंपनीच्या स्टॉकवर पाहायला मिळाला आहे. मंगळवारी बीएसईवर या स्टॉकची सुरुवात 1779.75 रुपयांनी झाली.त्यानंतर स्टॉक अडीच टक्क्यांनी घसरुन 1736 रुपयांवर आला. काही वेळांनतर स्टॉक 1754 रुपयांवर पोहोचला होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा