Maharashtra Politics Live Update : उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर
Sarkarnama August 06, 2025 01:45 PM
khalid ka shivaji : वरळीत CM फडणवीसांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी

मंगळवारी रात्री वरळीतील महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी करण्यात आली आहे. या घोषणाबाजीनंतर फडणवीसांनी कार्यक्रम खराब करू नका, असं आवाहन घोषणाबाजी करणाऱ्यांना केलं. त्यानंतर पोलिसांनी नंतर घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

Mumbai Police: मुंबई पोलिसांचा आता दर मंगळवारी जनता दरबार

मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी 'जनता दरबार' सुरू केला आहे. आठवड्यातून दर मंगळवारी हा 'जनता दरबार' भरवला जाणार असून यामध्ये नागरिकांना भेटीसाठी कोणतीही पूर्व परवानगी घ्यावी लागणार नाही. पोलिसांच्या उपक्रमामुळे आता सर्वसामान्यांना आपल्या अडचणी थेट आयुक्तांच्या कानावर घालता येणार आहेत.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर संध्याकाळी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तसंच ते पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार आहेत. शिवाय 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधींनी आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील ते हजर राहणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात आमदार आदित्य ठाकरे हे देखील उद्धव ठाकरेंसोबत असणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.