सोने दराने सर्व विक्रम मोडले, अमेरिकेच्या टॅरिफचा जळगाव सुवर्ण नगरीवर परिणाम, आजचा दर किती?
Marathi August 06, 2025 03:25 PM

आज सोन्याची किंमत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर 25 टक्के टेरीफ रेट (Donald Trump On India Tarrif) लावल्याने त्याचा परिणाम आता जळगावच्या सुवर्णनगरीवर झाला असल्याचं पाहायला मिळतंय? कारण गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ होऊन आज सोन्याचे दर हे जीएसटी (GST) शिवाय 1 दशलक्ष 600 तर जीएसटीसह हेच दर 1दशलक्ष 3 हजार 600 रुपया इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी सणांच्या अनुषंगाने सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे?

अमेरिकेच्या टॅरिफचा जळगाव सुवर्ण नगरीवर परिणाम

दरम्यानरशिया युक्रेन युद्धात भारत रशियाकडून क्रूड तेल खरेदी करत असल्याने, रशियाला युक्रेन युद्धासाठी मोठी आर्थिक मदत होत असल्याचा अमेरिकेने आरोप केलाय? तर भारताला रोखण्यासाठी अमेरिकेने भारतावर 25 टक्के टेरीफ रेट लावल्याने त्याचा परिणाम भारताच्या अर्थ व्यवस्थेवर होताना दिसत आहे. तसाएफ आणि परिणामी आता सुवर्ण बाजारावर ही पाहायला मिळत असून गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे? शिवाय कधी नव्हे ते सोन्याचे दर जीएसटी शिवाय 1,00, 600 तर जी एस टी सह 1, 00,3, 600 इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे वाढलेले सोन्याचे दर हे सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेरचे असल्याने ग्राहकांनी सोनेखरेदीकडे पाठ फिरविल्याचे पाहायला मिळतं आहे.

देशभरातील प्रमुख शहरांमधील आजच्या सोन्याचे दर

देशभरातील प्रमुख शहरांमधील आजच्या सोन्याच्या किमतींवर नजर टाकल्यास, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1,02,308 रुपये आणि 22 कॅरेट सोने 93,860 रुपये विकले जात आहे. अहमदाबाद आणि पटनामध्ये 24 कॅरेट सोने 1,02,280 रुपये आणि 22 कॅरेट सोने 93,760 रुपये उपलब्ध आहे. आर्थिक राजधानी मुंबईहैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1, 02, 230 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 93,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दर कसा ठरवला जातो?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की सोने आणि चांदीच्या किमती दररोज ठरवल्या जातात, ज्याचा परिणाम परकीय चलन दर, डॉलरच्या किमतीतील चढउतार, सीमाशुल्क आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीवर होतो. जेव्हा जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारापासून दूर जातात आणि सुरक्षित पर्यायांकडे वळतात, ज्यामध्ये सोने प्रमुख असते. भारतात सोन्याला केवळ सुरक्षित गुंतवणूक मानले जात नाही, तर त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील मोठे आहे.

लग्न आणि सणांच्या वेळी सोन्याची मागणी वाढते आणि ते समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. प्रत्येक युगात सोने महागाईपेक्षा चांगले परतावा देणारी गुंतवणूक असल्याचे सिद्ध झाले आहे, म्हणूनच त्याची मागणी नेहमीच कायम राहते.

संबंधित बातमी:

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.