जळगावजामोद तालुक्यातील गावात ५५ वर्षीय नराधमाने १८ महिन्यांच्या बालिकेवर अत्याचार केला.
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
POCSO कायद्यानुसार कलम ४, ८, १२ आणि भादंवि अंतर्गत गुन्हा नोंद.
घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी तीव्र.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातीलच एका ५५ वर्षीय नराधमाने अवघ्या १८ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, स्थानिक पातळीवरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
ही गंभीर घटना जळगावजामोद तालुक्यातील एका गावात घडली. पीडित बालिकेच्या आईने पोलिसातदिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मधुकर पुंजाजी हागे (वय अंदाजे ५५) याने त्यांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. सदर प्रकार उघडकीस येताच पीडितेच्या आईने तत्काळ जळगावजामोद पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलंत्यानुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ३७३/२०२५ अन्वये भारतीय दंड विधानातील कलम ६४ (१), ६५ (२), तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटककेली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ करत आहेत.
Buldhana Police : हातात कोयता घेऊन बनविली रील; सोशल मीडियावर व्हायरल होताच तरुणांना पोलिसांनी घडवली अद्दलया घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील बालिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा गुन्हेगारांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. पिडीतेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस त्वरित फास्ट ट्रॅक न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.
घटना कुठे घडली?
ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील एका गावात घडली.
आरोपी कोण आहे?
आरोपीचे नाव मधुकर पुंजाजी हागे असून त्याचे वय अंदाजे ५५ वर्षे आहे.
कायदेशीर कारवाई झाली का?
होय. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा व भारतीय दंड विधानातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
समाजात काय प्रतिक्रिया उमटल्या?
या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, फास्ट ट्रॅक न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.