82597
‘चाकरमान्यांचा प्रवास सुखदायक करा’
सावंतवाडी, ता. ६ ः कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सुरक्षित आणि त्रासमुक्त प्रवासाची व्यवस्था करा, अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईमेलद्वारे पत्र लिहून केली आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई आणि एमएमआरडीए परिसरातून लाखो चाकरमानी कोकणात त्यांच्या गावी जातात. या प्रवासादरम्यान भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर लक्ष वेधण्यासाठी भोसले यांनी काही प्रमुख समस्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.