वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा संबंध हा आपल्या दैनंदिन जीवनाशी असतो. आयुष्यात कधी-कधी अशी परिस्थिती येते, सगळं सुरळीत सुरू असताना अचानक मोठं आर्थिक संकट येतं. धनाची प्रचंड हानी होते आणि तुम्ही कर्जबाजारी होतात. याला कुठे नं कुठे तरी तुमच्या घरातील वास्तुदोष देखील जबाबदार असतो, असं धर्मशास्त्र सांगतं. धर्मशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार अनेकदा तुमच्या घराची रचना ही सदोष असते, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात, तुम्ही जेव्हा घर बांधता किंवा नवं घर विकत घेता, तेव्हा त्या घराची दिशा कोणती आहे, घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे? स्वंयपाक घर कोणत्या दिशेला असावं या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. जर तुमच्या घराची वास्तूरचना ही चुकीच्या पद्धतीनं असेल तर घरात वास्तुदोष निर्माण होतात. तसेच तुमच्या घरात काही चुकीच्या वस्तू असतील तरी देखील वास्तुदोष निर्माण होतात. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि तुमचं नुकसान होतं.
आपल्या घरात नेमका काय वास्तुदोष आहे, हे जर तुम्हाला कळत नसेल तर वास्तुशास्त्रात सांगितलेला दिव्याचा उपाय केल्यास आपोआप कोणताही वास्तुदोष तुमच्या घरातून नष्ट होईल. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, आणि तिची जागा साकारात्मक ऊर्जाने व्यापली जाईल. चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं.
कापूर – वास्तुशास्त्रानुसार सकाळी अंघोळ झाल्यानंतर दररोज तुमच्या देवघरासमोर कापूर लावावा, असं केल्यानं घरातील सर्व दोष नष्ट होतात. नकारात्मक ऊर्ज घरात प्रवेश करत नाही.
सायंकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावा – सायंकाळच्या वेळी नित्यनेमानं देवाजवळ दिवा लावा. यामुळे तुम्हाला कधीही पैशांची कमी पडणार नाही.
तुळशीजवळ दिवा लावा – सायंकाळच्यावेळी तुळशीजवळ दिवा लावावा, वास्तुशास्त्रानुसार जररोज सायंकाळच्यावेळी तुळशीजवळ दिवा लावल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, त्यामुळे कधीच तुमच्यावर आर्थिक संकट येत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)