Robert Kiyosaki: 'कोणीही करोडपती बनू शकतो', रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, फक्त ही एक गोष्ट करा
esakal August 10, 2025 01:45 AM
  • रॉबर्ट कियोसाकी यांनी बिटकॉइनला "श्रीमंतीचे तिकीट" म्हटले आहे.

  • रिअल इस्टेटपेक्षा बिटकॉइनमधील गुंतवणूक कमी मेहनतीची व जास्त फायद्याची असल्याचे ते म्हणतात.

  • 2025 मध्ये बिटकॉइनने 1,22,838 डॉलरचा उच्चांक गाठत गुंतवणूकदारांना विक्रमी परतावा दिला आहे.

Robert Kiyosaki Investment Tips: करोडपती होण्याचं स्वप्न कोणाचं नसतं? पण प्रत्येकालाच ते पूर्ण करता येतं असं नाही. मात्र प्रसिद्ध पुस्तक ‘रिच डॅड, पुअर डॅड’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचं म्हणणं आहे की, “कोणताही माणूस कोट्यधीश होऊ शकतो, आणि तेही फक्त एका गोष्टीच्या जोरावर – बिटकॉइन!”

कियोसाकी वारंवार लोकांना सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देतात. पण यावेळी त्यांनी थेट बिटकॉइनलाच 'श्रीमंतीचे तिकीट' म्हणून संबोधले आहे. आपल्या X (पूर्वी ट्विटर) अकाउंटवर त्यांनी लिहिले – "मला विश्वास बसत नाही की बिटकॉइनने श्रीमंत होणे इतके सोपे केले आहे. हा एक परफेक्ट असेट आहे – ना त्रास, ना ताण... फक्त पैसे लावा आणि विसरून जा."

रिअल इस्टेटपेक्षा सोपी गुंतवणूक

कियोसाकी सांगतात, "माझे पहिले एक मिलियन मी बिटकॉइनमधूननाही, तर रिअल इस्टेट गुंतवणुकीतून कमावले. पण त्यासाठी प्रचंड मेहनत, मोठा धोका आणि खूप पैसा लागला. त्या काळात मी अनेक रात्री झोपलो नाही."

Donald Trump Tariffs: ट्रम्प यांनी टाकला आणखी एक बॉम्ब; आता सोनं 10,000 रुपयांनी महागणार, गुंतवणूक करावी का?

त्यांच्या मते, रिअल इस्टेटमध्ये वेळ, पैसा आणि श्रम तिघांचाही प्रचंड वापर होतो. उलट बिटकॉइनमध्ये तेवढी मेहनत नाही. "मी थोडा रिसर्च केला, काही डॉलर गुंतवले आणि विसरलो. काही काळातच ते काही मिलियन डॉलर झाले. हा माझ्या आयुष्यातला सर्वात सोपा मिलियन होण्याचा मार्ग आहे," असे ते म्हणाले.

Trump Tariff: टॅरिफ बॉम्बमुळे अडचणी वाढल्या! ॲमेझॉन, वॉलमार्टने ऑर्डर थांबवल्या, करोडोंच नुकसान होणार

बिटकॉइन गुंतवणूकदारांसाठी2025 हे वर्ष ऐतिहासिक ठरले आहे. 14 जुलै रोजी बिटकॉइनने आपला सर्वकालीन उच्चांक 1,22,838 डॉलर गाठला. सध्या 1 बिटकॉइनची किंमत 1,14,104.12 डॉलर आहे. कियोसाकी यांच्या मते, योग्य वेळी बिटकॉइनमध्ये केलेली गुंतवणूक आयुष्य बदलू शकते.

FAQs

  • रॉबर्ट कियोसाकी कोण आहेत?
    - 'रिच डॅड, पुअर डॅड' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक व गुंतवणूक तज्ज्ञ.

  • ते बिटकॉइनबद्दल काय म्हणाले?
    - त्यांनी बिटकॉइनला श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हटले आहे.

  • बिटकॉइनची सध्याची किंमत किती आहे?
    - सध्या 1 बिटकॉइनची किंमत 1,14,104.12 डॉलर आहे.

  • रिअल इस्टेटपेक्षा बिटकॉइन का सोपे?
    - त्यात कमी मेहनत, कमी व्यवस्थापन व जास्त परताव्याची शक्यता आहे.

  • © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.