ट्रम्प प्रशासनाने स्वित्झर्लंडहून होणाऱ्या सोन्याच्या आयातीवर टॅरिफ दुप्पट केल्याने जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
तज्ज्ञांचा अंदाज आहे की पुढील एका महिन्यात सोन्याच्या दरात 150 डॉलर्सपर्यंत वाढ होऊ शकते.
या निर्णयाचा परिणाम गुंतवणूकदारांपासून ज्वेलर्सपर्यंत सर्वांवर होण्याची शक्यता आहे.
Donald Trump Tariffs: अमेरिकेने स्वित्झर्लंडमधून येणाऱ्या एक किलो आणि 100 औंस वजनाच्या सोन्याच्या बार्सवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकी सीमा शुल्क आणि सुरक्षा विभागाच्या (CBP) 31 जुलैच्या आदेशानुसार, हे बार्स आता कॅटेगरी कोड 7108.13.5500 मध्ये टाकण्यात आले असून त्यावर शुल्क आकारले जाणार आहे.
स्वित्झर्लंडला मोठा धक्कास्वित्झर्लंड हा अमेरिकेचा सर्वात मोठा सोन्याचा पुरवठादार आहे. जून 2024 पर्यंत अमेरिकेला तब्बल 61.5 अब्ज डॉलर्सच्या सोन्याचा पुरवठा केला आहे. नव्या टॅरिफनंतर यावर जवळपास 24 अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त शुल्क लागणार आहे.
स्विस प्रेशियस मेटल्स असोसिएशनचे अध्यक्ष क्रिस्टोफ वाइल्ड यांनी हा निर्णय “व्यापाराला आणखी एक धक्का” असे म्हटले. काही स्विस रिफायनरी कंपन्यांनीतर अमेरिकेला होणाऱ्या शिपमेंट्स थांबवायला सुरुवात केली आहे.
Premium| Loan Moratorium: नोकरी गेली, आता कर्ज कसं फेडू? टेन्शन नॉट, तुम्ही कर्जावर स्थगिती आणू शकता... एक किलो बारचे महत्त्वन्यूयॉर्कच्या COMEX बाजारात सर्वाधिक व्यापार होणारा एक किलो सोन्याचा बार हा मुख्यतः स्वित्झर्लंडहून येतो. लंडनमध्ये 400 औंसचे मोठे बार्स स्वित्झर्लंडमध्ये लहान करून अमेरिकेत पाठवले जातात. नव्या शुल्कामुळे हा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात दर वाढलेटॅरिफच्या निर्णयानंतर जागतिक बाजारात सोन्याचेदर विक्रमी पातळीवर गेले. COMEX बाजारात फ्युचर्स 46 डॉलर्सने वाढून 3,499.80 डॉलर्स प्रति औंस झाले. भारतामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 1,01,977 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. 2025 मध्ये आतापर्यंत भारतीय सोन्याने गुंतवणूकदारांना 33% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
Donald Trump: भारतासोबत कोणताही करार होणार नाही; ट्रम्प यांची स्पष्ट भूमिका, पंतप्रधान मोदींनीही दिले उत्तर पुढील महिन्यात आणखी वाढ?केडिया अॅडव्हायजरीचे अजय केडिया यांच्या मते, या निर्णयाने जागतिक पातळीवर पॅनिक खरेदी सुरू झाली आहे. पुढील एका महिन्यात सोन्याचे दर 150 डॉलर्सने उंचावून 3,640-3,650 डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे भारतातही सोन्याचे भाव 10,000 रुपयांनी वाढू शकतात.
FAQsप्र. 1: ट्रम्प यांनी कोणता निर्णय घेतला?
उ: स्विस सोन्याच्या आयातीवरील टॅरिफ दुप्पट केले.
प्र. 2: सोन्याच्या किंमतींवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
उ: तज्ज्ञांच्या मते एका महिन्यात $150 वाढ होऊ शकते.
प्र. 3: कोणावर सर्वाधिक परिणाम होणार?
उ: गुंतवणूकदार, ज्वेलर्स आणि आयातदार.