‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेचे दुसरे पर्व सध्या सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या मालिकेने टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या मालिकेतील तुलसी आणि मीहिरच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे.
या मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. यासोबतच तुलसीची ऑनस्क्रीन मुलगी अर्थात परी विरानीची सतत चर्चा होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का या मालिकेत तुलसीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणींची खरी मुलगी देखील खूपच स्टाईलिश आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या दुसऱ्या सीझनमध्ये शगुन शर्माने तुलसी आणि मिहिरची मुलगी परी विरानीची भूमिका साकारली आहे. तिचे सौंदर्य आणि ग्लॅमर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
शगुनने याआधी ‘ये है चाहते’ आणि ‘ससुराल गेंदा फूल 2’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केले आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. या मालिकेतील तिचा अभिनय आणि तुलसीसोबतची तिची बॉण्डिंग प्रेक्षकांना खूप आवडते.
स्मृती इराणी यांच्या खऱ्या मुलीचे नाव जोइश इराणी असे आहे. ती २१ वर्षांची असून तिच्या आईप्रमाणेच ती खूप सुंदर आहे. त्या दोघी माय-लेकींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग असून त्या अनेकदा एकत्र दिसतात.
जोइशने अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवले आहे, ज्यामुळे तिने तिची ओळख निर्माण केली आहे. ती एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तिने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला असून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्य पदके जिंकली आहेत.
जोइशचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंदवले गेले आहे. तिला स्वयंपाक करण्याची खूप आवड असून. तिने काही रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणूनही काम केले आहे.
जोइशचे इन्स्टाग्राम अकाऊंट खासगी असले तरी तिची आई स्मृती इराणी किंवा तिचे मित्र अनेकदा तिचे फोटो शेअर करत असतात. तिचे स्टायलिश लुक्स नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात.