Jagdeep Dhankhar News : जगदीप धनखड यांनी प्रकृती कारण देत 22 जुलैला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. तसेच त्यांच्याशी संपर्क देखील होत नाही, असे राजकीय नेते सांगत आहेत. राजीनामा दिल्यापासून ते गायब आहेत. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत याची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी द्यावी, अशी मागणी खासदार कपिल सिब्बल यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत शाह यांना तीन प्रश्न देखील विचारले आहेत.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? ते सुरक्षित आहेत का? ते संपर्काबाहेर का आहेत? असे प्रश्न सिब्बल यांनी विचारले आहेत. तसेच अमित शाहांना त्यांच्याविषयी माहीत असायला हवे. ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती होते; देशाने काळजी करायला हवी असे देखील म्हटले आहे.
परदेशात नेते गायब होतात, असे आम्ही ऐकले होते. मात्र भारतात लोकशाही आहे. धनखड यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांची प्रकृती ठीक आहे ना, याविषयी काळजी आणि भीती देखील सिब्बल यांनी व्यक्त केली आहे.
'22 जुलैला त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या विषयी माहितीच नाही. ज्या प्रकारे उपराष्ट्रपती असताना त्यांनी सरकारची रक्षा केली ते पाहता आता विरोधी पक्षांना त्यांची रक्षा करावी लागेल. मात्र ते कुठे आहेत याची माहिती मिळाली पाहिजे.", असे देखील सिब्बल यांनी सांगितले.
Nitin Gadkari Viral Video : "माझ्या जवळच्या साडे 3 लाख मतदारांची नावे कापली..."; राहुल गांधींच्या आरोपात तथ्य? गडकरींच्या 'त्या' व्हिडिओमुळे भाजपची डोकेदुखी वाढली फोन देखील उचलत नाहीत...सिब्बल म्हणाले, 'पहिल्या दिवशी धनखडयांना फोन केला होता तेव्हा त्यांच्या पीएने फोन उचलला होता. ते आराम करत असल्याचे सांगितले होते. मात्र नंतर किती वेळा फोन केला तरी कोण फोन आता उचलत नाही. इतर राजकीय नेत्यांशी देखील माझे बोलणे झाले त्यांन देखील हेच सांगितले की माजी उपराष्ट्रपतींसोबत संपर्क होत नाही.'
शाहांनी अधिकृत माहिती द्यावीमाजी उपराष्ट्रपतींसोबत कुठलाही संपर्क होत नाही. ते कुठे आहेत हे माहिती नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकृत वक्तव्य करत त्यांच्याविषयी माहिती द्यायला हवी. मी आग्रह करतो की गृहमंत्र्यांना उपराष्ट्रपाती कुठे आहेत ते सांगावे. फक्त एक वक्तव्य करावे. धनखड जेथे असतील तेथे आम्ही जाऊन त्यांना भेटू. ते सुरक्षित आणि स्वस्थ आहे ना हे महत्वाचे आहे. भारताचे इतिहास हे कधीच झाल नाही की उपराष्ट्रपतींनी राजीनाना दिला आणि ते कुठे आहेत हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आम्हाला काळजी वाटतेय, असे देखील सिब्बल म्हणाले.
Balasaheb Thorat : शरद पवारांना भेटलेल्या त्या दोघांनी कशाचे संकेत दिले? बाळासाहेब थोरातांनी सांगितलं..