वास्तुशास्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूची एक ठराविक दिशा आणि योग्य जागा असते त्यानुसार त्याची रचना घर बांधताना करायची असते. कधी-कधी वस्तूंना चुकीच्या दिशांना ठेवल्याने घरातील व्यक्तींना वास्तू दोष लागू शकतो. त्यामुळे घरातील लोकांच्या आयुष्यात एकामागोमाग अडचणी येऊ शकतात. त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तसेच कुंडलीती ग्रह देखील कमजोर होऊ लागतात.
आज आम्ही तुम्हाला बेडरुम आणि बाथरुमची योग्य दिशेसंदर्भात माहीती देणार आहोत. याच बरोबर वास्तूशास्रानुसार बाथरुमची जागा बेडरुममध्ये असणे वास्तूशास्रानुसार चुकीचे आहे की बरोबर हे देखील पाहणार आहोत.
बेडरुममध्ये बाथरुम नसावे का ?वास्तूशास्रानुसार बेडरुममध्ये कधीही बाथरुम नसायला हवे. कारण दोन्हीची ऊर्जा एकमेकापेक्षा वेगळी असते. जर दोन्ही ऊर्जांचा अदान-प्रदान झाले तर याचा परिमाण घरातल्या लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. याशिवाय आर्थिक हानी देखील होऊ शकते.
कोणत्या दिशेला बाथरुम नसावे ?वास्तूशास्रानुसार बाथरुम कधीच पूर्व – उत्तर दिशेला बांधू नये. बाथरुमसाठी दक्षिण-पश्चिम दिशा उत्तम असते.या शिवाय बाथरुमला एक खिडकी देखील हवी आहे.बाथरुमला कधीही डार्क रंगाच्या टाईल्स लावू नयेत.
जर तुमच्या बेडरुममध्ये बाथरुम आहे आणि त्याचा दरवाजा बाथरुमच्या दिशेने खुलतो तर अशा वेळी बाथरुमचा दरवाजा नेहमीच बंद ठेवावा.
न्हानी घर कोणत्या दिशेला असावे ?
शौचालय आणि स्नानघर कधीही कधीच एकत्र असू नये. दोन्हीला वेग-वेगळे बनवले पाहीजे. अन्यथा यामुळे कंडलीतील राहु आणि चंद्र ग्रह कमजोर होऊ शकतात. स्नानघर पूर्व दिशेला बांधले पाहिजे. आणि पाणी वाहण्याची दिशा उत्तरेला ठेवली पाहीजे.
( Disclaimer: वरच्या लेखातील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आम्ही या माहितीला दुजारो देत नाही किंवा समर्थनही करत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. )