Latest Maharashtra News Updates : सोलापूरच्या शरणु हांडे अपहरण प्रकरणातील आणखी दोन आरोपीना पोलीस कोठडी
esakal August 09, 2025 11:45 PM
Solapur Live: सोलापूरच्या शरणु हांडे अपहरण प्रकरणातील आणखी दोन आरोपीना पोलीस कोठडी

सोलापूरच्या शरणु हांडे अपहरण प्रकरणातील आणखी दोन आरोपीना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी

Pune Live: पुण्यात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
  • पुण्यात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

  • अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना

  • आरोपींना सिंहगड रोड पोलिसांकडून  48 तासांमध्ये अटक

  • गोविंदा कुमार ओमप्रकाश, राहुल कुमार श्यामकुमार असं अटक केलेल्या आरोपींची नावे

  • घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची पोलिसांकडून माहिती

Jalgaon Live: उत्तराखंडमध्ये अडकलेले तिघे जळगावात सुखरूप परतले
  • उत्तराखंडमध्ये अडकलेले तिघे जळगावात सुखरूप परतले

  • भुसावळ रेल्वे स्थानकावर नातेवाईकांनी केले स्वागत

  • ढगफुटीमुळे अडकले होते उत्तराखंडमध्ये

  • महाराष्ट्र व उत्तराखंड सरकार तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने आपण सुखरूप परतल्याची दिली माहिती

Shivsena Live: मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटातील शिवसैनिकांचा पक्ष प्रवेश

मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटातील अनेक शिवसैनिकांनी पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिंदे गटाला बळ मिळालं आहे.

Pune Live: बोपोडी चिखलवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे नागरिकांच्या वतीने उद्घाटन

बोपोडी चिखलवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे नागरिकांच्या वतीने उद्घाटन करण्यात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जल्लोष केला. चिखलवाडी येथील पाण्याच्या टाकीचे झाकण खुले करून नागरिकांना पाणी सोडण्यात आले, बिनकामाच्या नेत्यांच्या श्रेयासाठी होणाऱ्या बेकायदेशीर उद्घाटनांसाठी थांबण्याची गरज नाही. नागरिकांसाठी हेच खरे उद्घाटन आहे. पिण्याचे पाणी कोणत्याही उद्घाटनासाठी थांबवू नये, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती. म्हणूनच आज लाडू वाटून उद्घाटन करण्यात आले.

Pune Live: पुण्यातील कबुतराचा खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात

पुण्यातील कबुतरांच्या खाद्यबंदीचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. महापालिकेने शहरातील २० ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक खाद्य देण्यास बंदी घातली आहे, आणि या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड केला जातो. मात्र, पुण्यातील शाश्वत फाउंडेशनने या बंदीला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे. २०२३ मध्ये पालिकेने हा निर्णय घेतला होता, परंतु फाउंडेशनचे म्हणणे आहे की कबुतरांचा हक्क हिरावला जात आहे, म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Mumbai Traffic Live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनाची वाहतूक कोंडी

मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांची वाहतूक कोंडी झाली असून, मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर लांब रांगा विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड या भागात दिसून येत आहेत.

Pune Traffic Live: पुण्यात प्रचंड ट्रॅफिक जाम, लाडक्या बहिणी आणि भाऊ अडकले वाहतूक कोंडीत

भावंडांच्या स्नेहबंधनाचा सण असलेल्या रक्षाबंधनानिमित्त शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने पुण्यात येण्या-जाण्यासाठीच्या सर्व प्रमुख मार्गांवर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यासह शहरातील मध्यभागात आणि उपनगरांत देखील मोठी कोंडी झाली आहे.

Live: ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत ४ वर्षीय हरवलेली मुलगी सुरक्षित आईकडे परत

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत ४ वर्षीय मुलीला तिच्या आईकडे सुखरूप परत केले.

बोरीवली स्थानकावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या आईच्या नकळत लहानगी गाडीतून पुढे निघाली होती.

बोरीवली पोस्टकडून अंधेरी पोस्टला दिलेल्या सूचनेनंतर सहाय्यक उपनिरीक्षक पहुप सिंह, कॉन्स्टेबल विकास जायसवाल व एमएसएफ कर्मचारी किरण माळी यांनी लोकलच्या मध्यवर्ती महिला डब्यात शोध घेतला आणि मुलगी सापडली.

Live: मंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी पार पडले रक्षाबंधन

आज रक्षाबंधन सण हा सर्वत्र साजरा होत आहे, राजकीय नेते मंडळींमध्ये देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे, राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाईचा येथील निवासस्थानी देखील मतदार संघातील माता भगिनींनी मंत्री जयकुमार रावल यांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला आहे,

Pune Live: पुणे शहरात वाहतूक कोंडी

- पुणे शहरात वाहतूक कोंडी

- नवले ब्रिज ते वारजे ब्रिज पूर्ण ट्राफिक जाम

- सिंहगड रोड वडगाव ब्रिज येथेही पूर्ण ट्राफिक जाम आहे

- अनेक ठिकाणी सिग्नल बंद असल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीचा फटका

Live: दत्तात्रय भरणे यांनी पंगतीत बसून घेतला महाप्रसादाचा आस्वाद

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा साधेपणा सर्वांसमोर; पंगतीत बसून घेतला महाप्रसादाचा आस्वाद..

- पत्नी सारिका भरणे यांनी देखील पंगतीत उपस्थित भाविकांना प्रेमाने भोजन वाढण्याचे केले कार्य...

- सोशल मीडियावर दोन्ही व्हिडीओ होतं आहेत व्हायरल..

Girish Mahajan LIVE Updates: उत्तरकाशी येथे झालेल्या भूस्खलन व पुरस्थितीमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित - आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

उत्तरकाशी येथे झालेल्या भूस्खलन व पुरस्थितीमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित असून त्यांना आपत्तीग्रस्त भागातून जॉली ग्रँड विमानतळ तसेच मताली कॅम्प या सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले आहे - आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

Aaditya Thackeray LIVE Updates: उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल आदित्य ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, दोन्ही भाऊ अनेक वर्षांपासून चर्चा करत आहेत आणि आंदोलनांमधून ते एकत्र दिसत आहेत. पुढील निर्णय ते मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच घेतील, तर देशपातळीवर आम्ही (UBT SHIVSENA) इंडिया आघाडीत आहेत.

Mumbai Rain LIVE Updates: मुंबई शहर व उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता

मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. तसेच, ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भरती - दुपारी १२:१४ वाजता - ४.३६ मीटर. ओहोटी - सायंकाळी ६:१९ वाजता - १.५४ मीटर. भरती - रात्री ००:१३ वाजता (उद्या, १० ऑगस्ट २०२५) - ३.९३ मीटर. ओहोटी - पहाटे ६:०१ वाजता (उद्या, १० ऑगस्ट २०२५) - ०.५३ मीटर.

Beed Live: बीड परळी नाथरा फाटा येथे साधूवर दारुड्यांचा प्राणघातक हल्ला

बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत मारहाण करतानाचा व्हिडिओ मोबाईल मध्ये शूट करणे आणि तो सोशल माध्यमांवर व्हायरल करून परिसरामध्ये दहशत पसरवणे हा नवा फंडा बीडमध्ये पाहायला मिळत आहे बीडच्या परळीतील नाथरा फाटा येथे एका दारुड्याकडून भगव्या वेशात असणाऱ्या साधु वरती प्राण घातक हल्ला केला आहे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव दीपक पंडित असे असून जायकवाडी कॅम्प गाडी पिंपळगाव येथील तो रहिवासी आहे मात्र अद्याप पर्यंत पोलिसांनी या हल्लेखोरावर्ती कार्यवाही केली नाही हल्लेखोरा वरती तात्काळ गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Maharashtra Live: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय. निवडणूक आयोगाने बोलवल्यास कुणीही समोर जात नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Solapur Live: महाराष्ट्रात पहिल्यांदाच साखर कारखान्यातील कामगारांसाठी क्रिकेट लीगचे आयोजन

- सोलापूर जिल्ह्यातील कामगारांसाठी महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आलेय

- सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्याच्या टीम्स बनवून हे सामने भरविण्यात आलेत

- रोजच्या ताणतणावाच्या जीवनात कामगारांना तणावमुक्त होण्यासाठी याचे आयोजन करण्यात आलेय

- त्याचबरोबर कारखान्यातील एमडी आणि कामगार दोघेही खांद्याला खांदा लावून खेळल्याने समानतेची भावना देखील यातून जोपसण्यास मदत होणार आहे

- या क्रिकेट लीगच्या आयोजनानंतर आम्हाला राज्यभरातील साखर कारखान्यांनी राज्यस्तरीय सामने घेण्याची मागणी केलीय

- त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचे स्वरूप राज्यव्यापी असणार आहे.

नोकरीचं आमिष दाखवून तरूणीची फसवणूक

मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या आहे, तूला पोलीस दलात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका १९ वर्षांच्या मुलीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने १९ वर्षीय मुलीला नोकरीचे आमिष दाखवत साडेचार लाख रूपये लुबाडले

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर शनिवारीसकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे समोर आले. यामुळे एक्सप्रेस वे वर वाहनाच्या दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक्कोडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतुक संथ गतीने सुरु होती. तर पुण्याकडून मुंबईकडे जाणारे वाहनची वाहतुक पूर्णपणे थांबून होती. शिवाय, खंडळा टनेल जवळ वाहनाची मोठी वाहतूक कोंडी होती राक्षबंधन आणि सलग सुट्यामुळे वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Guhagar Live : शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक

हेदवतडमधील सभेत खोतकीबाबत केलेल्या विधानावरून उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नवा संघर्ष.

स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा ब्राह्मण समाजाचा भास्कर जाधव यांच्यावर आरोप....

राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची भास्कर जाधव यांना पत्राद्वारे करून दिली आठवण.

Shivendraraje Bhosale Live : महामार्गावरील लांज्यातील अवघड वळण ठरतेय डोकेदुखी

बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली.

तरी लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील एक वळण सध्या धोकादायक बनलंय.

अवजड वाहनांना इथून टर्न मारताना सध्या तारेवरची कसरतच करावी लागलेत.

तर या वळणावर असलेले खड्डे प्रवाशांची आणखी डोकेदुखी वाढतव आहेत.

बांधकाम मंत्री यांनी या वळणा संदर्भात तोडगा काढण्याची मागणी होतेय.

Eknath Shinde Live : अंबरनाथचं न्यायालयच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें हजर

अंबरनाथमधील नवीन न्यायालयाचं उदघाट्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज होत असून. ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अंबरनाथ न्यायालय सुरू झाल्यानंतर उल्हासनगर किंवा कल्याणला न जाता आता अंबरनाथमध्येच न्यायनिवाडा होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा न्यायालय ठाणे, जिल्हा न्यायालय कल्याण आणि उल्हासनगर तालुका वकील संघटना करत होत्या

Amravti LiveUpdate: रक्षाबंधनच्या निमित्ताने अमरावती बसस्थानकात लाडक्या बहिणींची माहेरी जाण्यासाठी मोठी गर्दी

प्रवास तिकिटात 50 टक्के सूट असल्याने महिलांची एसटी बसने जाण्यासाठी पसंती...

सकाळपासून अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात महिलांची मोठी गर्दी..

रक्षाबंधनच्या निमित्ताने गावी जाण्यासाठी गर्दी...

Nagpur LiveUpdate: नागपूरमधील राम झुला उड्डाणपुलावर दोन स्पेअर मधील अंतर वाढल्यामुळे वाढली चिंता

नागपूर आतील अत्यंत महत्त्वाच्या राम झुला उड्डाणपुलावर दोन स्पेअर मधील अंतर वाढल्यामुळे चिंता वाढली आहे...

* रामजीला उड्डाणपूल पश्चिम नागपूर आणि पूर्व नागपूर तसेच रेल्वे स्टेशन आणि सीए रोडला जोडणारा महत्त्वाचा उड्डाण पूल आहे..

* मात्र जेव्हा रेल्वे स्टेशन वरून सीए रोडच्या दिशेने उड्डाणपूल खाली उतरतो तिथे पोद्दारेश्वर राम मंदिराच्या समोर दोन स्पेअर मधील अंतर ८० मिलिमीटर पर्यंत वाढला आहे..

* साधारणपणे दोन स्पेअर मधील अंतर 25 मिलिमीटर ते 40 मिलिमीटर असायला हवं..

* मात्र या उड्डाणपुलावरील दोन स्पेअर मधील हा अंतर का वाढला आहे याचा शोध आता एमएसआरडीसीला घ्यावा लागणार आहे.

* दरम्यान अंतर वाढलेल्या दोन्ही स्पेअर वरून जेव्हा जड वाहतूक म्हणजेच ट्रक किंवा बस जातात तेव्हा त्या ठिकाणी जोरदार कंपन होत असल्याचेही जाणवत आहे...

Pune LiveUpdate: पुण्यात पाणी वापरावर मर्यादा यावी यासाठी महापालिका आयुक्ताचा निर्णय

शहरात १०० टक्के पाणी मीटर बसवा

शहरातील २ लाख ६३ नळ जोडणीपैकी अवघे १ लाख ८५ हजार मीटर बसवण्यात आले

अजून ७७ हजार बाकी आहेत एका महिन्यात कस उद्दिष्ट पूर्ण होणार याची चर्चा

दिवसाला २ हजार मीटर बसवणे अपेक्षित असताना अवघी ३०० मीटर बसवले जातात

Pandharpur News Live : नारळी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेला अलंकार परिधान

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमे निमित्ताने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, मोठ्या दंडपेट्या जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, लहान व मोठा शिरपेच, मत्स्य जोड, मोठी बोरमाळ, लक्ष्मीहार, तोडे जोड, मोहनमाळ, तुळशीची माळ तसेच श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले.

Jammu And Kashmir News Live: कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, २ जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये गेल्या ९ दिवसांपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. शुक्रवारी रात्रभर चकमक सुरू असून या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर दोघे जखमी झालेत. एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं.

Pune Live News : पुण्यातील कबुतरांच्या खाद्यबंदीचा वाद हायकोर्टात

महापालिकेने शहरातील २० ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक खाद्य टाकण्यास बंदी केली आहे. उल्लंघन करणाऱ्यांना ५०० रुपयाचा दंड केला जातो. मात्र पुण्यातील शाश्वत फाउंडेशनने या बंदीला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे. २०२३ मध्ये पालिकेने हा निर्णय घेतला होता. मात्र कबुतरांचा हक्क हिरावून घेतला जातोय म्हणत फाउंडेशनने उच्च न्यायालयात याचिका केली दाखल.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात २४ पर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांकरिता आंदोलने केली जात आहेत. राजकीय पक्षांकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) ते (फ) आणि कलम ३७ (३) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी जिल्ह्यात सोमवारी (ता. ११) सकाळी सहा वाजल्यापासून २४ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

Amit Shah : घुसखोरांना मतदानाचा अधिकार नाहीच; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कडाडून टीका

सीतामढी (बिहार) : बिहारमधील मसुदा मतदारयाद्यांच्या पडताळणीवरून राजकारण शिगेला पोचले असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याच मुद्यावरून कडाडून टीका केली आहे. घुसखोरांना मतदानाचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Kolhapur News : खिद्रापूर ग्रामपंचायतीमधील उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) च्या उपसरपंच पूजा शिवगोंडा पाटील विश्वासात घेऊन काम करीत नाहीत, असा ठपका ठेवत ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. या ठरावावर निर्णय घेण्यासाठी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी १२ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेची अधिसूचना काढली आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार नियोजित विशेष सभेत चर्चा होऊन गुप्त मतदानाच्या माध्यमातून उपसरपंचपदाच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. तहसीलदारांनी या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली असून, सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Belgaum Rain : यल्लमा डोंगरावर मुसळधार पाऊस; काही मिनिटांतच पाण्याचे प्रचंड लोंढे, शेती पाण्याखाली

बेळगाव : यल्लमा (रेणुका) सौंदत्ती डोंगर परिसरात शुक्रवारी (ता. ८) दुपारी अचानक मुसळधार पावसाचा जोरदार मारा झाला. अवघ्या काही मिनिटांत डोंगरावरून प्रचंड प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहू लागले. या अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, काही ठिकाणी लहान नाल्यांना पूर आला.

Mumbai High Court : अहिल्यानगर, पुणे, चंद्रपूरच्या न्यायाधीशांची सर्किट बेंचसाठी नियुक्ती; चौदा विधी अधिकाऱ्यांची नावेही जाहीर

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी पुणे, अहिल्यानगर, चंद्रपूर येथील तीन न्यायाधीशांची विशेष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याशिवाय मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील १४ विधी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे आदेशही जारी झाले आहेत.

Pune Police : ड्रग्ज पार्टीत पोलिसांनी पकडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता!

पुणे : ड्रग्ज पार्टीत पोलिसांनी पकडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. खेवलकरच्या मोबाईलमध्ये ज्या व्हिडिओ क्लीप सापडल्यात, त्या पैकी 4 तरुणींनी पोलिसांनी शोधून काढल्याची माहिती आहे. या तरुणींनी तक्रार केल्यास खेवलकरविरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

Mahadevi Elephant : 'महादेवी हत्तीणी'साठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार

जयसिंगपूर : महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी शासन, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त पुनर्विचार याचिका सोमवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. शासन, वनतारा आणि मठ यांच्यात एकमत झाले असले, तरी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि निकालाकडे ‘महादेवी प्रेमीं’चे लक्ष लागून राहिले आहे.

Raksha Bandhan 2025 : बहीण-भावाच्या नात्याचा अनोखा उत्सव आज; 'रक्षाबंधन' सण सर्वत्र होणार साजरा

Latest Marathi Live Updates 9 August 2025 : बहीण-भावाच्या नात्याचा अनोखा उत्सव 'रक्षाबंधन' आज सर्वत्र साजरा केला जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावरून राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राहुल यांनी निवडणूक आयोगावर थेट आरोप केले असल्याने शुक्रवारी आयोगानेही राहुल यांना ‘दावा खरा असेल तर सहीसह प्रतिज्ञापत्र सादर करा’ असे आव्हान दिले. भाजपने राहुल यांच्यावर टीका केलीये. तसेच महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी शासन, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त पुनर्विचार याचिका सोमवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सर्वांत दीर्घकालीन दहशतवादविरोधी कारवाई कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी, आठव्या दिवशीही सुरू होती. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.