मावळ : माय मराठीतील अ, ब, क, ड, या अक्षरांची ओळख करून देण्यासोबतच विद्यार्थ्यांना वेगळ्या भाषेची ओळख व्हावी या अनुषंगाने जर्मन भाषेचेही धडे दिले जात आहेत. मावळच्या सुदुंबरे या आदिवासी परिसर असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेचा एक अनोखा अभिनव उपक्रम आहे. शाळेतील आदिवासी विद्यार्थी देखील जर्मन भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
मावळच्या सुदुंबरे गावातील संत तुकाराम नगर मधील आदिवासी वस्तीत जिल्हा परिषदची शाळा आहे. या शाळेत दाखल असलेल्या विद्यार्थ्यांना मराठीतील अ ब क ड ई सोबतच जर्मन भाषेचेही ज्ञानदान दिले जात आहे. हे जर्मन भाषेचे ज्ञान विद्यार्थी आवडीने आत्मसात करताना दिसत आहे. या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पारंपारिक व्यवहार ठाकर भाषेतच होतात. तरी देखील शाळेने हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे.
Mumbai Kabutarkhana : कबुतरखाना हटवण्यावरून दादरमध्ये राडा, जैन समाज आक्रमक, शेकडो आंदोलक रस्त्यावर | VIDEOसुरवातीला शिक्षकांनी शिकली जर्मन भाषा
शाळेतील मुलांमध्ये इतर भाषांमध्ये संवाद साधण्यासाठी क्षमता निर्माण व्हावी. यासाठी शिक्षकांनी जर्मन भाषा शिकून विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहे. हा मावळतील प्रयोग पहिलाच जिल्हा परिषदच्या शाळेत केला आहेत. या शाळेच्या शिक्षिका कालिंदी कस्पटे यांनी जर्मन भाषा मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जर्मन भाषेतील प्राथमिक शब्दसंग्रह संवाद आणि उच्चार मुलांना शिकवण्यास सुरुवात केली आहे.
Crime News : परप्रांतीयांकडून तिघांवर प्राणघातक हल्ला; दोन तरुण गंभीर जखमीमुलांकडून नियमित बोलण्याचा प्रयत्न
गुड मॉर्निंग, थँक्यू, गुड नाईट, हाऊ आर यू, यासारख्या शब्दांचा सराव मुलांकडून होऊ लागला आहे. तिसरी आणि चौथ्या वर्गातील वीस मुले आपल्या आपसातही जर्मन भाषेतील शब्द वापरून संवाद साधू लागली आहे. दरम्यान अभ्यासक्रम सध्या संवादाभोवती केंद्रित झाला आहे. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त मुले आपली माहिती, आवड निवड, घरातील गोष्टी, वाचन अशा विषयावर जर्मन शब्दात बोलण्याचा प्रयत्न करत आहे. लेखन उच्चार आणि ऐकण्याचा सरावही सुरू आहे.