आजच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकजण तंदुरस्त राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेत असतात. आरोग्याची काळजी घेत असताना योग्य आहार घेणे देखील महत्वाचे आहे. अशातच योग्य आहार घेताना अनेकजण ब्रोकोलीचे सेवन करत असतात. कारण ब्रोकोलीत असलेले पोषक तत्व, जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कर्करोगाशी लढण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला आतून बळकट करण्यासाठी ब्रोकोलीला ‘सुपरफूड’ मानले जाते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या भाजीला तुम्ही इतके फायदेशीर मानता ती काही लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील असू शकते. चला मग आजच्या लेखात जाणून घेऊयात की कोणत्या लोकांनी ब्रोकोलीचे सेवन करणे टाळावे.
जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर ब्रोकोली तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. ब्रोकोलीमध्ये ‘गॉइट्रोजन’ नावाचा घटक असतो जो थायरॉईड संप्रेरकाचे उत्पादन थांबवू शकतो. जर तुम्हाला हायपोथायरॉईडीझमचा त्रास असेल तर ब्रोकोलीचे जास्त सेवन केल्याने तुमची समस्या आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांनी ब्रोकोली खाणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी खूप चांगले असते, परंतु ज्या लोकांची पचनसंस्था कमकुवत असते किंवा ज्यांना अनेकदा गॅस आणि पोटफुगीची तक्रार असते त्यांच्यासाठी ब्रोकोलीचे सेवन हानिकारक ठरू शकते. ब्रोकोलीमध्ये असलेले फायबर आणि विशेष प्रकारचे कार्बोहायड्रेट्स पोटात गॅस निर्माण करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थता वाटू शकते.
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करते. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर ब्रोकोली खाल्ल्याने या औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. यामुळे रक्त गोठण्याचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत या रुग्णांनी ब्रोकोली खाण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
किडनी स्टोनच्या रुग्णांनीही ब्रोकोलीचे सेवन कमी करावे. ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे काही प्रकारचे किडनी स्टोन तयार होऊ शकतात. याशिवाय ब्रोकोलीमध्ये ऑक्सलेट देखील असते, जे शरीरात कॅल्शियमशी एकत्रित होते आणि स्टोन तयार होण्यास मदत करते. जर तुम्हाला किडनीशी संबंधित काही समस्या असतील तर तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गर्भधारणेदरम्यान ब्रोकोली फायदेशीर मानली जाते, परंतु ती जास्त प्रमाणात खाणे हानिकारक असू शकते. कच्ची किंवा जास्त प्रमाणात ब्रोकोली खाल्ल्याने पोटात गॅस आणि अपचन होऊ शकते, जे गर्भवती महिलांसाठी अस्वस्थ करू शकते. म्हणून गर्भधारणेदरम्यान ब्रोकोली मर्यादित प्रमाणात आणि चांगली शिजवल्यानंतरच खावी. तसेच आहारात ब्रोकोलीचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)