Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौैऱ्याचा आज दुसरा दिवस
Marathi August 07, 2025 09:25 AM

Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीचे सर्व घटकपक्ष बैठकीला हजर असतील. राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित असतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळेही उपस्थित असणार आहेत. इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्यासंदर्भात स्वतः उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आगामी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, मोदी सरकार विरोधातली पुढची रणनीती, बिहार निवडणुका यांवर आज रणनीती ठरेल. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.