पंचांग -
गुरुवार : श्रावण शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ६.०१ सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय सायंकाळी ५.५१, चंद्रास्त पहाटे ४.४३, बृहस्पती पूजन, भारतीय सौर श्रावण १६ शके १९४७.
दिनविशेष -
२००३ - ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’तर्फे (नासा) आकाशगंगेतील काही लघुग्रहांना ‘कोलंबिया’ या अपघातग्रस्त अवकाशयानातील सर्व दिवंगत अंतराळवीरांची नावे देण्याचा निर्णय. यात भारतीय अंतराळवीर कल्पना चावला हिचाही समावेश आहे.
२०१५ - महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने हैदराबाद येथील फेडरेशन करंडक ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.