इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात आकाश दीपने साजेशी कामगिरी केली. भारताला मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून दिल्या आणि विजयात हातभार लावला. पण आता आकाश दीप कारवाई करावी यासाठी इंग्लंडचा प्रशिक्षकाने थेट आयसीसीचं दार ठोठावलं आहे. त्यांनी आकाश दीपवर निशाणा साधला आहे. नेमकं काय झालं की प्रशिक्षकाने थेट आयसीसीकडे धाव घेतली? अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील काही सामन्यात खेळाडू आमनेसामने आले होते. त्यामुळे या मालिकेची रंगत वाढली होती. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आकाश दीप आणि इंग्लंडचा ओपनर यांच्यात तू तू मैं मैं झाली होती. यानंतर बेन डकेटच्या कोचने आयसीसीकडे आकाश दीपवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा सलामीचा फलंदाज बेन डकेटला टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज आकाश दीपने विकेटकीपर ध्रुव जुरेलच्या हाती झेल बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. डकेट तंबूत परतत असताना आकाश दीपने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि काही सांगितलं.
आकाश दीपच्या या कृतीमुळे बेन डकेटचे प्रशिक्षक जेम्स नॉट यांचा संताप झाला. रिपोर्टनुसार, त्यांनी आकाश दीपवर बंदी घालण्याची मागणी केली आह. अशी कृती पुन्हा घडू नये यासाठी धडा शिकवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. जेव्हा बेन डकेट मैदानात असतो तेव्हा तो वेगाने धावा करतो. टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत हे दिसून आलं. शेवटच्या कसोटी सामन्यात बेन डकटसोबत आकाश दीपने जे काही केलं त्यावर आयसीसीने कठोर कारवाई करायला हवी होती.
आकाश दीपने बेन डकेटला कसोटीत तीन वेळा बाद केलं आहे. शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात आकाश दीपने बेन डकेटला बाद केलं होतं. त्यामुळे त्याचं अर्धशतक हुकलं होतं. डकेटने पाच कसोटी सामन्यातील 9 डावात 51.33 च्या सरासरीने 462 धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर आकाश दीपने तीन कसोटी सामन्यातील सहा डावात 13 विकेट घेतल्या. आकाश दीपने एजबेस्टन कसोटीत पाच विकेट घेऊन टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.