देशात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच बऱ्याच हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय देखील चालत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने हॉटेलमध्ये गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार एका तरुणाने हॉटेल कर्मचाऱ्यांकडे रात्रीसाठी मुलीची मागणी केली होती. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला नकार दिल्यामुळे तो संतापला आणि त्याने हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. ही धक्कादायक घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे.
मेरठमधील घटनागोळीबाराची ही घटना मेरठमधील टीपी नगरमधील वेदव्यासपुरीमधील एका हॉटेलमध्ये घडली आहे. सध्या या गोळीबाराच्या घटनेची परिसरात चर्चा सुरु आहे. गोळीबार झालेले हे हॉटेल मेरठमधील वेदव्यासपुरी येथील डिवाइड रोडवर आहे. सुमीत आणि अमित हे दोघे या हॉटेलचे मालक आहेत. सुमितने या घटनेबाबत सांगितले की, शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता एक तरुण बाईकवरून आला आणि त्याने मुलीची मागणी केली त्यामुळे आम्हाला धक्का बसला.
सुमीतने आरोपी तरुणाला सांगितले की, हॉटेलमध्ये अशा प्रकारची सुविधा मिळत नाही. त्यामुळे तरुण रागवला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. त्याने अशी मागणी का केली आणि नकार मिळाल्यानंतर त्याने आक्रमक रूप धारण केले. सुरुवातीला हॉटेल कर्मचाऱ्यांनी आरोपीकडे दुर्लक्ष केले, मात्र या तरुणाने कर्णचाऱ्यांना धमकी दिली आणि तो हॉटेलमधून निघून गेला.
आरोपी पुन्हा आलाआरोपी तरुणी माघारी गेल्यानंतर सुमीत यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र आरोपी पुन्हा रात्री 10 वाजताच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आला आणि त्याने हॉटेलवर गोळीबार केला. आरोपीने चालवलेली गोळी काचेला लागली आणि काउंटरवर बसलेल्या सुमीतचा जीव थोडक्यात वाचला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेतील आरोपीचे नाव राज असे आहे. तो टीपी नगर परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडे असणारे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.