बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा थरार 28 सप्टेंबरपर्यंत रगंणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यंदा आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघामध्ये मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या आशिया कप ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच यंदा या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 21 वर्षांनतर वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. यंदा या स्पर्धेत 2 दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील गतविजेता आहे.
आशिया कपमध्ये यंदा 21 वर्षानंतर पहिल्यांदाच 2 खेळाडूंची उणीव भासणार आहे. टीम इंडियाचे 2 अनुभवी खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत. या दोन्ही खेळाडूंनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या दोघांची निवड करण्यात आली नाही. अशाप्रकारे या दोघांशिवाय 21 वर्षानंतर आशिया कप स्पर्धा होणार आहे. याआधी 2004 साली या दोघांशिवाय आशिया कप स्पर्धेचा थरार रंगला होता. मात्र तेव्हा या दोघांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं नव्हतं. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक आशिया कप स्पर्धेत विराट आणि रोहित सहभागी झाले होते.