Shirish Gavas Death Cause : ब्रेन हॅमरेजमूळे शिरीषचा मृत्यू, जाणून घ्या जीवघेण्या आजाराची लक्षणे
Marathi August 07, 2025 08:25 PM

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध युट्युबर शिरीष गवसचे दुःखद निधन झाले. ‘रेड सॉईल स्टोरी’ या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून तो आणि त्याची पत्नी पूजा कोकणातील खाद्य संस्कृती दाखवायचे. पण मधल्या काळात त्याला ब्रेन हॅमरेजचे निदान झाले आणि अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या आजाराची काही प्रमुख लक्षणे असतात. जी वेळीच लक्षात आली तर जीव वाचू शकतो का? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (shirish gavas of red soil stories death cause is brain hemorrhage know symptoms, causes and prevention)

ब्रेन हॅमरेज म्हणजे काय?

ब्रेन हॅमरेज म्हणजेच मेंदूतील रक्तस्राव. ही एक अतिशय गंभीर आरोग्य स्थिती आहे. जी मेंदूशी संबंधित असल्याने प्राणघातक ठरते. ब्रेन हॅमरेजला मेंटल अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोकदेखील म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदू किंवा त्याच्या आसपासच्या ऊतींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होणे. मेंदू स्वतःहून ऑक्सिजन घेऊ शकत नाही. तसेच पोषण साठवू शकत नाही. यासाठी तो रक्तवाहिन्यांच्या जाळ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे जेव्हा मेंदूमध्ये रक्तस्राव होतो तेव्हा रक्तवाहिन्या फुटतात आणि मेंदू रक्ताने भरतो. असावेळी त्वरित उपचार न मिळाल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो.

ब्रेन हॅमरेजची लक्षणे

अचानक असह्य डोकेदुखी
गिळण्यास त्रास होणे
नजर अस्पष्ट होणे
समजण्यास कठीण होणे
तंद्री लागणे
बेशुद्ध पडणे
झटके येणे
बोलताना अडखळणे वा दातखिळी बसणे

ब्रेन हॅमरेजची कारणे

डोक्याला गंभीर दुखापत होणे
व्हिटॅमिन केची कमतरता
मेंदूच्या नसांमध्ये रक्त गोठणे
रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार
सतत ताण- तणावात असणे

ब्रेन हॅमरेज होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी

वेळोवेळी तुमचा रक्तदाब तपासा.
उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा.
वजनावर नियंत्रण ठेवा.
निरोगी आहार घ्या.
नियमित व्यायाम मिळवा.
शरीरात पोषक घटकांची कमतरता होणार नाही याची काळजी घ्या.
अल्कोहोल घेणे आणि नशेच्या पदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळा.
महत्वाचे म्हणजे ब्रेन हॅमरेजची लक्षणे वेळीच लक्षात घ्या आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार त्वरित उपचार सुरू करा.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=cdo89cxprvm

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.