Eknath Shinde Congratulates Amit Shah 'बाळासाहेबांचे स्वप्न, ऑपरेशन महादेव, नक्षलवादाचा...', अमित शाहांचे कौतुक करताना एकनाथ शिंदे थकेनात, गृहमंत्रिपदाचा विक्रमासाठीही अभिनंदन
Sarkarnama August 07, 2025 04:45 AM

Eknath Shinde News : गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या नावावर अनोखा विक्रम केला आहे. सर्वाधिक काळ गृहमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या नावावर होता. मात्र, हा विक्रम अमित शाह यांनी मोडला आहे. भारताच्या इतिहासामध्ये सलग २,२५८ दिवस गृहमंत्रिपद भूषवणारे अमित शाह हे पहिलेच गृहमंत्री झाले आहेत.

अमित शाह यांच्या या विक्रमाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत त्यांचे अभिनंदन देखील केले. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जात शहा यांची आजच भेटली घेतली आहे. त्यांनी शहा यांचे अभिनंदन केले. शहा यांनी केलेल्या विक्रमाविषयी शिंदे यांनी ट्विट देखील करत अभिनंदन केले आहे. या विक्रमासाठी शिंदेंनी शहांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

शिंदेम्हणाले आहेत, 'भारताच्या इतिहासात सलग २,२५८ दिवस सेवा देणारे मा.ना.श्री. अमित शहाजीसाहेब देशाचे पहिले गृहमंत्री ठरले आहात. याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. ३७० कलम रद्द करून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करणारे, देशातील नक्षलवादाचा बीमोड करणारे आपण सक्षम गृहमंत्री तर आहातच. पण सहकारापासून समृद्धीचा ध्यास घेत देशाच्या प्रगतीचा निर्धार करणारे आपण कार्यकुशल, दृढ निश्चयी नेते आहात. देश हितासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी आपणांस शुभेच्छा.'

Pratap Patil Chikhlikar : अजितदादा शब्दाला पक्के, पण मंत्रीपदासाठी चिखलीकरांना स्थानिकमध्ये 'रिझल्ट' द्यावा लागेल! अमित शहा-एकनाथ शिंदेंची भेट

संसदेचे अधिवेशन सुरू आहे. एकनाथ शिंदे हे एका महिन्यात तिसऱ्यांदा दिल्लीत आले आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटी विषयी बोलताना ते म्हणाले की, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने माझे दिल्ली दौरे होत आहेत. अमित शाहांजीसोबतची भेट ही राजकीय भेट नव्हती. माझ्यासोबत आमचे खासदार देखील होते. खासदारांना त्यांच्या मतदारसंघात काही अडचणी आहेत त्यामुळे त्यासोडवण्यासाठी शहा यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदींना देखील भेटणार

अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. पंतप्रधान मोदींसोबत त्यांची आज नियोजित भेट आहे. शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटी मागचे कारण आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक असल्याची चर्चा आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असताना शिंदेंपुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ते दिल्लीतून मोर्चेबांधणी करत असल्याचे देखील बोलले जात आहे.

महादेवीबाबत मोठी बातमी : जनरेट्यापुढे वनतारा झुकले? माफीनाम्यानंतर दुसऱ्यांना टीम कोल्हापुरात दाखल
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.