सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली सई! पाँडिचेरी चित्रपटातील 'निकिता' ठरली सई ताम्हणकरसाठी गेमचेंजर! अभिनयाचं सोनं पुन्हा खुललं!
esakal August 07, 2025 06:45 AM

सई ताम्हणकरला पाँडिचेरी चित्रपटातील 'निकिता' भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

चित्रपटात ती स्वावलंबी, आईची भूमिका साकारताना अनेक जबाबदाऱ्या स्वतः सांभाळत होती.

सईने ही भूमिका आपल्यासाठी खास आणि करिअर बदलणारी असल्याचं म्हटलं आहे.

अभिनय आणि फॅशन अशी ओळख अभिनेत्री सई ताम्हणकर हिची आहे. सईच्या कामाचा वाढता आलेख हा कायम उंचावत असतो आणि अशातच सईला पाँडिचेरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झालाय.

पाँडिचेरी चित्रपटासाठी सई उत्कृष्ठ अभिनेत्री ठरलीय. चित्रपटातील अभिनय अनेक गोष्टी साठी चर्चेत राहिला तो म्हणजे तिचा साधा सरळ पण तितकाच लक्षवेधी लूक, अनेक भाषा मधला तिचा या चित्रपटातील संवाद आणि एका मुलाच्या आईची भूमिका यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना सई ताम्हणकर म्हणाली की, 'पाँडिचेरी या संपूर्ण चित्रपटाचा अनुभव खूप वेगळा आणि कमाल होता. आम्हाला कोणत्याही कलाकाराला या चित्रपटासाठी स्टाफ नसताना हेअर करणं , स्वतःचा ठरलेला कॉस्च्युम घालून रेडी होणं असं सगळं करताना मी स्वावलंबी झाले आणि हे फक्त पाँडिचेरी मुळे शक्य झालं. पाँडिचेरी मधली निकिता ही भूमिका माझ्यासाठी जीवाच्या अत्यंत जवळची आहे'

दरम्यान सईबद्दल बोलायचं झालं तर हिंदी असो किंवा मराठी सईने अभिनयाची चुणूक दोन्ही इंडस्ट्रीत दाखवून दिली आहे. येणाऱ्या काळात देखील सई दमदार प्रोजेक्ट्स मधून दिसणार असल्याचं कळतंय.

FAQs

सई ताम्हणकरला कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला?

तिला पाँडिचेरी चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.

'पाँडिचेरी' चित्रपटात सईची भूमिका कोणती होती?

सईने ‘निकिता’ नावाच्या आईची आणि स्वावलंबी महिलेची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात सईने वेगळं काय केलं?

सईने कोणताही स्टाफ न घेता स्वतःचं सगळं काम केलं – हेअर, मेकअप, कॉस्च्युम.

सईने पुरस्काराबद्दल काय प्रतिक्रिया दिली?

तिने सांगितलं की ही भूमिका तिच्या जीवाच्या अत्यंत जवळची आहे.

ती हसली आणि तो फसला! ललित आणि हृताची जोडी सर्वांच्या नजरेत भरली... 'आरपार' प्रेमाची जादुई मखमल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.