झुंझुनू (राजस्थान) : झुंझुनू जिल्ह्यातील नवलगड परिसरातील कुमावास गावात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना (Dog Shooting Incident) घडली आहे. दोन दिवसांपासून एक रायफलधारी व्यक्ती गावात खुलेआम फिरत कुत्र्यांवर गोळीबार करत होता. २ आणि ३ ऑगस्टच्या रात्री गावातील रस्ते रक्ताने माखले होते. या गोळीबारात सुमारे २५ निरपराध कुत्र्यांचा जीव गेला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण (Rajasthan Animal Cruelty) गंभीर बनले. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते, की एक व्यक्ती रायफल घेऊन रस्त्यावर फिरत आहे आणि कुत्र्यांवर बिनधास्त गोळीबार करत आहे.
सहा वर्षीय मुलीच्या गुप्तांगावर आदळले सायकलीचे चाक अन् केली बेदम मारहाण; १२ ते १४ वयोगटातील पाच मुलांचं कृत्यपोलिसांनी त्वरित दखल घेत तपासासाठी हेड कॉन्स्टेबल शुभकरण यांना घटनास्थळी पाठवले. तेथे त्यांना अनेक मृत कुत्र्यांचे शव सापडले, काही अजूनही वेदनेमुळे तडफडत होते. पोलिस तपासात उघड झालं, की डुमरा गावातील रहिवासी शेओचंद बावरिया याने हे कृत्य केलं आहे. त्याने स्वतःच्या बंदुकीने हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अटकेसाठीही प्रयत्न सुरू आहेत.
गावामध्ये प्रचंड भीती आणि संतापाचं वातावरण आहे. ग्रामस्थ म्हणतात की, अशी क्रूरता त्यांनी कधीच पाहिली नव्हती. 'आज कुत्रे मारले गेले, उद्या माणसे असुरक्षित असतील,' अशी लोकांमध्ये भीती आहे.
भावाला ओवाळण्याची इच्छा अपूर्णच! गोठ्यात करंट उतरून गायीसोबत सासू-सुनेचा शॉक लागून मृत्यू, रक्षाबंधनला माहेरी जाणार होती सुवर्णागावचे माजी सरपंच सरोज झझारिया यांनी या घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दिली. त्यांच्या मते, 'आरोपीने जाणीवपूर्वक हा कट रचून प्राण्यांची हत्या केली. गावकऱ्यांना संशय आहे, की ही टोळी याआधीही गावात आली होती आणि पुन्हा येऊन दहशत माजवत आहे.' पोलिसांनी आश्वासन दिलं, की आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. मात्र, गावकऱ्यांच्या मनातील भीती आणि अस्वस्थता अद्यापही कायम आहे.