बिग बॉसचा पहिला सिझन 2006 मध्ये प्रसारित झाला होता. अभिनेता राहुल रॉय या सिझनचा विजेता ठरला होता. त्याला एक कोटी रुपये मिळाले होते. या सिझनमध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक सहभागी झाले होते.
दुसऱ्या सिझनमध्ये आशुतोष कौशिकने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली होती. या सिझनच्या विजेत्यासाठीही एक कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आशुतोषताही एक कोटी रुपये मिळाले होते.
तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेता विंदु दारा सिंह विजेता ठरला होता. त्यालासुद्धा एक कोटी रुपये बक्षिसाची रक्कम मिळाली होती. सध्या तो ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीने बिग बॉसच्या चौथ्या सिझनचं विजेतेपद जिंकलं होतं. आतापर्यंतच्या स्पर्धकांपैकी तिला सर्वांत लोकप्रिय मानलं जातं. तिलाही एक कोटी रुपये मिळाले होते.
बिग बॉसच्या पाचव्या सिझनचंही विजेतेपद एका टीव्ही अभिनेत्रीने पटकावलं होतं. ही अभिनेत्री होती जूही परमार. जूहीलाही एक कोटी रुपये मिळाले होते. त्यानंतर कोमोलिका या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या उर्वशी ढोलकियाने सहावं सिझन जिंकलं होतं. यावेळी मात्र बक्षिसाची रक्कम कमी करण्यात आली होती. उर्वशीला 50 लाख रुपये मिळाले होते.
बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये अभिनेत्री गौहर खानला विजेतीच्या रुपात पाहिलं गेलं होतं. तिलासुद्धा 50 लाख रुपये बक्षीस मिळालं होतं. आठव्या सिझनचा विजेता गौतम गुलाटीलाही तितकीच रक्कम मिळाली होती.
बिग बॉसच्या नवव्या सिझनचा विजेता प्रिन्स नरुला ठरला होता. तर दहाव्या सिझनचं विजेतेपद मनवीर गुर्जरने पटकावलं होतं. या दोघांनाही पन्नास लाख रुपये बक्षिस मिळालं होतं.
अभिनेत्री शिल्पा शिंदेनं अकरावं सिझन जिंकलं होतं. यावेळी बक्षिसाची रक्कम आणखी कमी करण्यात आली. शिल्पाला 44 लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर बाराव्या सिझनची विजेती दीपिका कक्करला आणखी कमी रक्कम मिळाली. तिला फक्त 30 लाख रुपये देण्यात आले होते.
‘बिग बॉस’चा तेरावा सिझन खूप लोकप्रिय ठरला होता. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला या सिझनचा विजेता ठरला होता. सिद्धार्थला 50 लाख रुपये मिळाले होते. काही वर्षांपूर्वीच त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
चौदाव्या सिझनची विजेती रुबिना दिलैकला 36 लाख रुपये आणि त्यानंतर पंधराव्या सिझनची विजेती तेजस्वी प्रकाशला 40 लाख रुपये मिळाले होते.
‘बिग बॉस 16’चा विजेता एमसी स्टॅनला 31 लाख 80 हजार रुपये मिळाले होते. त्यानंतर सतराव्या सिझनसाठी मुनव्वर फारुकीला ही रक्कम वाढवून 50 लाख रुपये देण्यात आले.
अभिनेता करणवीर मेहरा ‘बिग बॉस 18’चा विजेता ठरला. त्यालासुद्धा 50 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले होते. आता एकोणिसाव्या सिझनसाठी बक्षिसाची रक्कम किती ठरवण्यात येईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.