राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई केली जाईल असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलय. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी साठी त्यांचा आजपासून कोकण दौरा आहे. रायगडमधील रस्त्याची पाहणी केल्यानंतर ते रत्नागिरीत दाखल झाले आज कशेडी बोगद्याची त्यांनी पाहणी केली.कशेडी ते रत्नागिरी या टप्प्याची त्यांनी पाहणी केली. कशेडी बोगदा येथे त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची दिली नांदणी मठाला भेटस्वस्तिश्री जिनसेन पट्टरक भट्टारक महास्वामी यांची मनोज जरांगे यांनी घेतली भेट
महादेवी हत्तींनी संदर्भात आणि सध्या सुरू असलेल्या लढ्या संदर्भात केली चर्चा
Pune Live : वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटनावडील रागावल्यामुळे मुलाने आत्महत्या केली
पुण्याच्या राजगड तालुक्यातील विंझर धनगरवस्तीतील घटना
गणेश गोसू चव्हाण असं या 16 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव
Mumbai Live : नारळी पौर्णिमेच्या सुट्टीमुळे परीक्षा अचानक रद्दमुंबई महानगरपालिकेतर्फे नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठा गौरी विसर्जनची सुट्टी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या या काळात होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
Delhi Live : पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं जाणार?एनडीए 12 ऑगस्टपर्यंत उपराष्ट्रपदासाठी त्यांचा उमेदवार जाहीर करणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार संसदेचं पावसाळी अधिवेशन वेळेपूर्वी तहकूब केलं जाईल. 12 ऑगस्ट रोजी क्रीडा विधेयक मंजूर झाल्यावर अधिवेशन तहकूब केलं जाऊ शकते.
Ahilyanagar Live : अहिल्यानगरमध्ये पावसाची जोरदार हजेरीअहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संगमनेर, अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचं जोरदार आगमन झालं. त्यामुळे खरीप शेतीला जीवनदान मिळेल.
Mumbai Live : विक्रोळी नगरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर त्याच्याच बाजूला निष्ठावंत आमदार सुनील राऊत असे बॅनरविक्रोळी नगरात आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनेक कार्यक्रम आहेत यामुळे शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी केली आहे त्याच प्रमाणे शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी देखील निष्ठावंत आमदार सुनील राऊत असा उल्लेख करणारे बॅनर देखील मोठ्या प्रमाणात विक्रोळी नगरात लावले आहेत.
Live : मनपा शाळांचे खाजगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू – आमदार अस्लम शेख यांचा इशाराबृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने मालवणी टाऊनशिप येथील मुंबई पब्लिक स्कूलमधील इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग खाजगी संस्थेला चालविण्यास दिल्याच्या निर्णयाला आमदार अस्लम शेख यांनी तीव्र शब्दांत विरोध करत, हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा असलम शेख यांनी आज झालेल्या पालक शिक्षक बैठकीत दिला आहे.
"पालिकेच्या शिक्षकांना बेरोजगार करून, खासगी संस्थांमार्फत शिक्षक नेमून शाळांचे खाजगीकरण करण्याचे षड्यंत्र सुरू आहे." त्यांनी प्रशासनावर ठपका ठेवत विचारले की, “इमारतींसाठी कोट्यवधी खर्च करणाऱ्या पालिकेकडे शिक्षक भरतीसाठी पैसे नाहीत का?” असा सवालही आमदार शेख यांनी उपस्थित केला आहे.
वर्गमित्राने भरदिवसा आठवीच्या विद्यार्थ्यावर केले धारदार शस्त्राने वारपाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गुरुवारी दुपारी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन सहाध्यायांनी चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Navneet Rana: भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकीभाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी...
सोशल मीडियावर रिल्स तयार करून नवनीत राणा यांना गळा कापण्याची आणि जीवाने मारण्याची धमकी....
यापूर्वीही अनेकवेळा नवनीत राणा यांना आले आहे जीवे मारण्याच्या धमक्या..
सध्या अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्याकडून तक्रार दाखल करणे सुरू
Raigad Live : किल्ले रायगडच्या पायरी मार्गावरील संरक्षण भिंत कोसळलीकिल्ले रायगडच्या पायरी मार्गावरील संरक्षण भिंत कोसळली
रायगड किल्ल्यावरील महादरवाजाखाली काही अंतरावर होती हि संरक्षण भिंत
नव्याने बांधण्यात आली होती संरक्षण भिंत
किल्ले रायगडावर शिवकालीन पद्धतीने होणाऱ्या बांधकामावर निकृष्ठ दर्जाचे आरोप होत असताना संरक्षण भिंत कोसळल्याची घटना
सांगली जिल्ह्यातील ड्रग्ज विषयी खूप काही गोष्टी आता कंट्रोलमध्ये आले आहे. यापुढे जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत गाव पातळीवरील तंटामुक्त समिती या प्रभावी करणे हा उद्देश असल्याचं सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी मधील उद्योजकांच्या सोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये बैठक पार पडली,या बैठकीमध्ये उद्योजकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्याचा आश्वासन ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Mumbai LIve : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टीची तारीख जाहीरसन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) (दि. १६ ऑगस्ट, २०२५) व अनंत चतुर्दशी (दि. ०६ सप्टेंबर, २०२५) या ऐवजी नारळी पौर्णिमा (दि. ०८ ऑगस्ट, २०२५) व ज्येष्ठगौरी विसर्जन (दि. ०२ सप्टेंबर, २०२५) निमित्ताने स्थानिक सुट्टी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना जाहीर करण्यात आली आहे.
Live: कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम- कोर्टकबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम- कोर्ट
दादर मधील कबुतरखान्यावरून कोर्टाची सुनावणी
विषेमुळे आरोग्याचे कधी न भरणारे नुकसान
Live: महादेवी हत्तीणीसाठी सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखलमहादेवी हत्तीणीसाठी सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल
सीआर जया सुकीन यांनी दाखल केली याचिका
महादेवी हत्तीणीला परत नांदणीत आणण्यात यावे यासाठी मागणी केली जात आहे
Solapur Live: गुरुवार पेठेत निलकंठेश्वराच्या रथोत्सवात महिलांची भव्य कलश मिरवणूकशहरातील गुरवार पेठेतील निलकंठेश्वर मंदिराच्या वतीने श्रावणाच्या निमित्त महिलांची कलश मिरवणूक व रथोत्सव सोहळा
Dharashiv Live : उद्धव ठाकरेंना दिसत नाही त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल, बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीकाभाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरेंना दिसत नाही त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागेल
नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टिका
मोदींनी योगा दिवस दिला संपूर्ण देशाने स्वीकारला
मोदींनी दहशतवादाच्या विरोधात लढाई उभारली देश उभा राहिला, दहशतवादाविरोधात जग उभ राहिल
Uttarakhand Live: उत्तराखंडमध्ये अडकला मुलुंडमधील 62 जणांचा ग्रुपउत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने चारधाम यात्रेसाठी गेलेले अनेक पर्यटक अडकले असून त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश आहे
मुलुंड मधील 62 जणांचा ग्रुप देखील अडकला असून यातील साठ वर्षीय कांचन गोहिल यांच्या कुटुंबातील प्रतीक गोहिल यांनी याबाबत माहिती दिली आहे
31 जुलै ला निघालेला हा ग्रुप दरड कोसळल्यानंतर उत्तराखंड मधील गंगोत्री येथील एका हनुमान आश्रम मध्ये अडकून असल्याचा शेवटचा फोन त्यांना आला होता
या सर्वांना लवकरात लवकर रेस्क्यू केले जावं आणि त्यांना महाराष्ट्रात आणलं जावं अशी मागणी प्रतीक गोहिल यांनी प्रशासनाकडे केली आहे
Beed Live: बीड जिल्ह्याला मोठा निधी उपलब्ध करुन देणार-अजित पवारबीड जिल्ह्याला चांगला निधी उभा करुन देणार आहे. समाजातले सगळे घटक, प्रशासन आणि राजकीय लोकही माझ्यासोबत उभे राहतील, असं प्रतिपादन अजित पवार यांनी बीडमध्ये केलं.
Mumbai Live: उत्तराखंडमध्ये अडकले मुलुंडमधील ६२ पर्यटकउत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने चारधाम यात्रेसाठी गेलेले अनेक पर्यटक अडकले असून त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश आहे. मुलुंड मधील 62 जणांचा ग्रुप देखील अडकला असून यातील साठ वर्षीय कांचन गोहिल यांच्या कुटुंबातील प्रतीक गोहिल यांनी याबाबत माहिती दिली आहे. 31 जुलै ला निघालेला हा ग्रुप दरड कोसळल्यानंतर उत्तराखंडमधील गंगोत्री येथील एका हनुमान आश्रममध्ये अडकून असल्याचा शेवटचा फोन त्यांना आला होता. या सर्वांना लवकरात लवकर रेस्क्यू केले जावं आणि त्यांना महाराष्ट्रात आणलं जावं अशी मागणी प्रतीक गोहिल यांनी प्रशासनाकडे केली आहे.
CM Live: देश घडवण्यासाठी ओबीसींचं मोठं योगदान- मुख्यमंत्रीओबीसी समाज हा देशाच्या पाठीचा कणा आहे. देश घडवण्यासाठी ओबीसींचं मोठं योगदान आहे. मी सुरुवातीपासूनच ओबीसी चळवळीसोबत काम करतोय आणि इथून पुढेही करत राहीन, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Shashi Tharoor Live Updates: आपण अमेरिकन निर्यातीवरही ५०% कर लादला पाहिजे; काँग्रेस खासदार शशी थरूरअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त २५% कर लादण्याच्या निर्णयावर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "त्याचा निश्चितच परिणाम होईल कारण आपला त्यांच्याशी ९० अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. जर सर्व उत्पादने ५०% महाग झाले तर खरेदीदारांनाही वाटेल की त्यांनी भारतीय उत्पादने का खरेदी करावीत? ... जर त्यांनी असे केले तर आपण अमेरिकन निर्यातीवरही ५०% कर लादला पाहिजे ... असे नाही की कोणताही देश आपल्याला अशी धमकी देऊ शकतो..."
Mumbai News LIVE Updates: ED कडून 750 कोटींच्या GST घोटाळ्याप्रकरणी मुंबई येथे एकूण ८ ठिकाणी छापेमारीED कडून ₹750 कोटींच्या GST घोटाळ्याप्रकरणी रांची, कोलकाता आणि मुंबई येथे एकूण ८ ठिकाणी छापेमारी सुरू आहे. छाप्यांच्या दुसऱ्या टप्प्यात शिवकुमार देओरा व त्यांच्याशी संबंधित गटाच्या मालमत्तांवर तपास सुरू आहे.
परभणी तालुक्यातील दैठणा येथील मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांचा चार चाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली परभणी गंगाखेड रस्त्यावरील दैठणापासून दोन किमी माळ सोना फाट्याजवळ हा अपघात झाला असून दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे पुष्पा उत्तम कछवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी उत्तमराव कच्छवे यांच्या पत्नी,तर अजनाबई सुरेशराव शिसोदे असे मयत झालेल्या महिलांची नावे आहेत
Mumbai Goa Highway : मंत्री करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी, कंत्राटदार लागले कामालामंत्र्यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा जाहीर झाला आहे. त्यानंतर ठेकेदारांकडून रस्ता सुस्थितीत असल्याचं दाखवण्यासाठी धडपड सुरू आहे. महामार्गाची पाहणी मंत्री करणार म्हणून ठेकेदारांची पॅचवर्क आणि खड्डे भरण्याची लगबग सुरू झालीय. महामार्गाच्या रखडलेल्या पट्ट्यातील डायवर्शन सुद्धा काढण्याचे काम केलं जात आहे. कांटे ते निवळी असा रखडलेला मुंबई गोवा महामार्गावरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. सकाळपासून ठीक ठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याचा देखील काम सुरू आहे.
Dadar Kabutarkhana Live : दादरमध्ये कबुतरखान्याजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तदादर येथील कबूतर खाना इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतर खाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते अचानक जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी कबुतर खाण्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली.
Parbhani : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना गाडीनं उडवलं, दोघींचाही मृत्यूपरभणी तालुक्यातल्या दैठणा इथं मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांचा चारचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. परभणी गंगाखेड रस्त्यावरील दैठणापासून दोन किमी माळ सोना फाट्याजवळ अपघात झाला. पुष्पा उत्तम कच्छवे आणि अंजनाबाई शिसोदे असं मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
PM Modi Live : शेतकऱ्यांच्या हिताला सरकारचे प्राधान्य : पंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, " शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. मला वैयक्तिकरित्या माहित आहे की मला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, परंतु मी त्यासाठी तयार आहे. आज, भारत देशातील शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी तयार आहे..."
Dharashiv Live : भुममध्ये पोलिस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्लाधाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये पोलिस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला कऱण्यात आला आहे. या प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Live : यवतमध्ये पोलिसांची आज गावकऱ्यासोबत शांतता बैठकपुणे जिल्ह्यातील यवतमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. यात शिथिलता देण्यात आली आहे दरम्यान पोलिस आज गावकऱ्यांसोबत शांतता बैठक घेणार आहेत.
Pune News : कोथरूडमधील एमआयटी कॉलेजबाहेर दोन गटांत हाणामारीपुणे : कोथरूड परिसरातील एमआयटी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Pune Airport : पुणे-भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकल्यामुळे उड्डाण केलं रद्दपुणे विमानतळावर पुणे-भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकल्यामुळे उड्डाण रद्द केले. विमानतळांवर वारंवार कुत्रे बिबट्या, पक्षी येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवासाच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे विमानतळवरून भुवनेश्वरला उड्डाण्याच्या तयारीत असलेलं 1098 हे विमान रद्द करावा लागला आहे.
Karnataka News : तालुका, जिल्हा पंचायती निवडणुका वर्ष अखेरीस घेणार - प्रियांक खर्गेहुबळी : राज्यातील तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरपर्यंत निश्चितपणे घेण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे यांनी केली आहे.
Karnataka News : मोटारीने कुत्र्याला चिरडल्याने चालकाविरोधात गुन्हा दाखलबंगळूर : येथील जेबीनगर पोलिस ठाण्याने मोटारचालकाविरोधात भटक्या कुत्र्याला गाडीखाली चिरडून ठार मारल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. ही घटना तीन ऑगस्ट रोजी एचएएल तिसऱ्या स्टेजमधील बेकरीसमोर घडली होती. याप्रकरणी स्थानिक रहिवासी अभिजित दास यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘केए-०३, एनएस ३३३०’ या क्रमांकाची मोटार चालवणाऱ्या अनोळखी व्यक्तीने बेकरीसमोर झोपलेल्या कुत्र्यावर गाडी चालवली. यामुळे कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिस मोटारीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. अधिक तपास सुरू आहे.
Raju Shetti News : महादेवी नांदणी मठात परत येत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील : राजू शेट्टीकोल्हापूर : महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी वनतारा आणि महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा कोल्हापूरच्या जनरेटा तयार केला. त्यामुळेच शक्य झाले. मात्र, जोपर्यंत मठामध्ये महादेवी परत येत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. आज जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांची आज शिरोळमध्ये सभाशिरोळ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २६ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणास बसण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी आज (ता. ७) मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत घोंगडी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती धनाजी चुडमुंगे यांनी दिली. मराठा आरक्षण लढा निर्णायक ठरवण्यासाठी मराठा समाजाने २९ ऑगस्टला मुंबईत येण्यासाठी जरांगे यांचा जागर दौरा सुरू आहे. त्या दौऱ्यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शिरोळमध्ये येणार आहेत. येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज तक्तात बैठक होणार असून, बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलन अंकुशचे प्रमुख चुडमुंगे यांनी केले आहे.
Mahadevi (Madhuri) Elephant LIVE : वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये उपचार घेत असलेली महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठात परतणार!Latest Marathi Live Updates 7 August 2025 : वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये उपचार घेत असलेली महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये परतणार आहे. तिच्या घरवापसीसाठी नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा संस्था न्यायालयात एकत्रित पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. तसेच रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्याचे कारण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर आणखी २५ टक्के एवढे आयातशुल्क लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापारी करारावरून सुरू असलेली बोलणी अद्याप निर्णायक पातळीवर पोहोचली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यामध्ये चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. दादरच्या कबुतरखान्यावरील महापालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढत विरोध दर्शविण्यात आला होता. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..