WI vs PAK : पाकिस्तानला लोळवण्यासाठी विंडीज सज्ज, शुक्रवारपासून एकदिवसीय मालिका
GH News August 08, 2025 03:08 AM

बांगलादेश विरुद्ध टी 20i मालिका गमावणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीमने विंडीज दौऱ्यात जोरदार कमबॅक केलं. पाकिस्तान क्रिकेट टीमने सलमान आघा याच्या नेतृत्वात विंडीजवर मात करत टी 20i मालिका जिंकली. पाकिस्तानने टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर विंडीजने दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली. तर पाकिस्तानने रविवारी 3 ऑगस्टला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विंडीजवर 13 धावांनी मात करत एकूण दुसरा सामना जिंकला. पाकिस्तानने अशाप्रकारे 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

त्यानंतर आता विंडीज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. शे होप या मालिकेत विंडीजचं नेतृत्व करणार आहे. तर मोहम्मद रिझवान याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही संघाचा हा पहिलाच सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या पहिल्या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना केव्हा?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी 8 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना कुठे?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिल्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिल्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 11 वाजता टॉस होईल.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

विंडीज विरुद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहता येईल.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 8 ऑगस्ट, त्रिनिदाद

दुसरा सामना, 10 ऑगस्ट, त्रिनिदाद

तिसरा सामना, 12 ऑगस्ट, त्रिनिदाद

वरील तिन्ही सामने एकाच स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.