टीम इंडियाने अवघ्या काही दिवसांपूर्वी यजमान इंग्लंडवर पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. भारताने यासह इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्कलोडमुळे या मालिकेतील फक्त 3 सामन्यांमध्येच खेळला. बुमराह या मालिकेत भारताला एकही सामन्यात विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मात्र त्याने प्रतिस्पर्ध्यांना रोखून ठेवलं. बुमराहने सलग 2 सामन्यांमध्ये 5-5 विकेट्स घेतल्या. आता बुमराहनंतर आणखी एका गोलंदाजाने अशीच कामगिरी केलीय. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हॅनरी याने झिंब्बावे विरुद्ध एकाच मालिकेत सलग दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केलीय.