तुमचे दात मोत्यांसारखे चमकतील, फक्त 'ही' एक गोष्ट तुमच्या टूथपेस्टमध्ये करा मिक्स
Tv9 Marathi August 09, 2025 06:45 AM

दात पिवळे पडणे कधीकधी चारचौघात लाजिरवाणे ठरते. पिवळ्या दातांमुळे बरेच लोकं बाहेर जाणंही टाळतात. पिवळ्या दातांमुळे तोडांची दुर्गंधीही येऊ लागते. तसेच दात पिवळे पडण्यामागे अनेक कारणे असतात, जसे की योग्यरित्या ब्रश न करणे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी. अशातच लोक दात पांढरे शुभ्र करण्यासाठी महागड्या प्रोडक्टचा वापर करतात. पण त्यांचा काहीसा परिणाम दिसून येत नाही. अशातच तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करा. यासाठी तुम्हाला तुमच्या टूथपेस्टमध्ये फक्त एक गोष्ट मिक्स करून दात स्वच्छ केल्यास तुम्ही मोत्यासारखे पांढरे दात मिळवू शकता. कसे ते चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

मोत्यासारखे पांढरे दात मिळविण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही महागड्या प्रोडक्टची किंवा पांढरेपणा आणण्यासाठी उपचारांची आवश्यकता नाही. यासाठी तुम्ही फक्त हळदीचा वापर करा. कारण हळद दात पांढरे करण्यास उपयुक्त आहे.

खरंतर हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा एक पॉवरफूल अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतो. जो दातांचा पिवळापणा दूर करतो आणि दात चमकदार बनवतात.

हळदीमध्ये आढळणारे करक्यूमिन केवळ दात पांढरे करण्यास मदत करत नाही तर सुजलेल्या हिरड्या, पोकळी, प्लेक आणि तोंडाच्या संसर्गासह इतर अनेक दातांच्या समस्यांपासून आराम देते.

दात पांढरे करण्यासाठी हळद वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रशवर टूथपेस्ट घ्यावी लागेल आणि त्यात चिमूटभर हळद टाका. दररोजप्रमाणे दात घासा.

हळदीव्यतिरिक्त, तुम्ही इतर काही नैसर्गिक गोष्टींनी दातांचा पिवळापणा दूर करू शकता. यासाठी बेकिंग सोडा देखील एक चांगला पर्याय आहे. बेकिंग सोड्यात सौम्य अपघर्षक गुणधर्म असतात जे दातांवर जमा झालेला पिवळा थर काढून टाकण्यास मदत करतात.

तुम्ही नारळ तेल देखील वापरू शकता. नारळ तेलात अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे दातांचा पिवळापणा दूर करतात. यासोबतच ते हिरड्या मजबूत करण्यास देखील मदत करते. तुम्हाला फक्त नारळ तेल तोंडात घेऊन 10 मिनिटे फिरवा. अशाने तोंडाच्या संसर्गासह इतर अनेक दातांच्या समस्यांपासून आराम मिळते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.